• Download App
    मिझोराममध्ये अधिक मुले जन्माला घालणाऱ्या दाम्पत्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर In Mizoram Rs 1 lakh prize Is Announced for couple who gives birth to more children

    मिझोराममध्ये अधिक मुले जन्माला घालणाऱ्या दाम्पत्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

    वृत्तसंस्था

    आईजोल : पूर्वोत्तर भारतातील मिझोराममध्ये लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे. जास्त मुले जन्माला घातल्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. In Mizoram Rs 1 lakh prize Is Announced for couple who gives birth to more children

    मिझोरामचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रॉयटे यांनी अधिक मुले जन्माला घालणाऱ्या मिझो दाम्पत्याला स्वतःच्या वतीने एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा नुकतीच केली. जास्त म्हणजे किती ती संख्या रॉयटे यांनी स्पष्ट केली नाही. राज्यातील मिझो जनजाती संपू नये, यासाठीच ही घोषणा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    पूर्वोत्तर राज्य मिझोरामचे मूळ रहिवासी मिझो जनजातीचे आहेत. या जनजातीची लोकसंख्या गेली काही वर्षे कमी झाल्याने मिझो जनता चिंतेत आहे. त्यामुळेच ही जनजाती वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून मिझोरामचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रॉयटे यांनी फादर्स डेनिमित्त केलेल्या भाषणात राज्यात अधिकाधिक मुले जन्माला घालणाऱया दाम्पत्याला व्यक्तिशः एक लाख रुपये पारितोषिक देण्याची घोषणा केली.

    लोकसंख्येची घनता प्रतिचौरस किमीला ५२ नागरिक अशी आहे. जी देशाच्या मानाने कमीच आहे. राज्याची एकूण लोकसंख्या ११.२ लाख आहे. त्यामुळेच मिझो जनजातीचे अस्तित्व कायम राखण्याचे आवाहन रॉयटे यांनी केले. रॉयटे यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे.

    In Mizoram Rs 1 lakh prize Is Announced for couple who gives birth to more children

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट