कात्रज येथील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरीत्या मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना तब्बल 22 गॅस सिलिंडरचा एकामागे एक स्फोट झाल्या प्रकरणात पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. In katraj area २२ cylinder blast case three accused arrested by Bharti vidyapith police
विशेष प्रतिनिधी
पुणे – कात्रज येथील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरीत्या मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना तब्बल 22 गॅस सिलिंडरचा एकामागे एक स्फोट झाल्या प्रकरणात पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
सागर संदीप पाटील (26, रा. स. नं. 65/3, त्र्यैक्य जिमच्या पाठीमागे, अंजलीनगर, कात्रज,पुणे), संपत सावंत, जागा मालक दत्तात्रय काळे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस शिपाई गणेश खंडू काळे (25) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींवर भा.द.वि. कलम 285, 308, 435, 436, 336 तसेच जीवनावश्यक अधिनियम कलम 3 व 7 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांनी 14 भरलेले 8 गॅस सिलिंडर, 14 किलोचे रिकामे 14 गॅस सिलिंडर तसेच 2 किलोचे व 4 किलोचे काही रिकामे आणि भरलेले सिलिंडर जप्त केले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सागर संदीप पाटील याचा आयटीआयचा कोर्स झाला असून तो एक हॉटेल व्यावसायिक आहे. त्याबरोबरच तो घरगुती वापराच्या गॅसचा सिलिंडरचा साठा करून त्यातून चार किलोच्या आणि दोन किलोच्या सिलिंडरमध्ये गॅस भरून विकत असल्याचे काम करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तर एक अल्पवयीन व संपत सावंत पाटील याच्याकडे काम करणारे आहेत. तर दत्तात्रय काळे हा जागा मालक असून या सर्वांच्या संगनमताने हा अवैध प्रकार कात्रज येथील सुंधामाता मंदिराच्या पाठीमागे असलेल्या अंजलीनगरमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता. मंगळवारी (दि. 29) सायंकाळी पाचच्या सुमारास अशाच अवैध पद्धतीने घरगुती वापराच्या सिलिंडरमधून लहान दोन किलोच्या व चार किलोच्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना स्फोट झाला.
यावेळी तब्बल 22 सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाले. एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा करून बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग करताना आग लागून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असताना आरोपींनी नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणली. या स्फोटात गाड्यांचे तसेच नागरिकांच्या घराचेही नुकसान झाल्याने व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी चौघांवरही विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
In katraj area २२ cylinder blast case three accused arrested by Bharti vidyapith police
महत्त्वाच्या बातम्या
- सर्व दुकानांवर मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
- इंधनाचे दर वाढवून केंद्र सरकार सामान्यांचे खिशातील पैसे लुटते – नाना पटाेले
- BJP – AAP : भाजप-आप आंदोलनात आमने-सामने; दिल्लीत केजरीवाल टार्गेटवर तर मुंबईत दरेकर टार्गेटवर!!
- आसाम व मेघालयाचा सीमाप्रश्न सुटला; गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या