• Download App
    Goa Assembly Election Result 2022: गोव्यात मतदारांनी पिरगाळली वाघाची शेपटी, घड्याळाची टिकटिक रोखली ; शिवसेना, राष्ट्रवादीचा धुव्वा। In Goa, voters stopped clock and twisted tail of he tiger' ; Shiv Sena, NCP's washing

    Goa Assembly Election Result 2022: गोव्यात मतदारांनी पिरगाळली वाघाची शेपटी, घड्याळाची टिकटिक रोखली ; शिवसेना, राष्ट्रवादीचा धुव्वा

    वृत्तसंस्था

    पणजी – गोवा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. निकालात असे स्पष्ट झाले की, मतदारांनी वाघाची शेपटी पीरगळली असून घड्याळाची टिकटिकही बंद पडली. तसेच काँग्रेसला थोडासा हात दिला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा धुव्वा उडाल्याचे चित्र आहे. In Goa, voters stopped clock and twisted tail of he tiger’ ; Shiv Sena, NCP’s washing

    महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने गोव्यात भाजपाविरोधात दंड थोपटले होते. तसेच संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते गोव्यात जाऊन ठाण मांडून बसले होते. गोव्यातील निकालांकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र २०१७ प्रमाणे शिवसेनेच्या पदरात निराशा पडली आहे. शिवसेनेला गोव्यात केवळ ०.२ टक्के मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही केवळ १ टक्का मते मिळाली आहेत. दोन्ही पक्षांपेक्षा गोव्यात नोटाला १.१३ टक्के मते मिळाली आहे.

    गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत निवडणूक लढवली होती. तसेच शिवसेनेकडून भाजप आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात जोरदारा आघाडी उघडली होती. परंतु सावंत यांचा विजय झाला आहे.



    आदित्य ठाकरे यांचीही गोव्यात मोठी प्रचारसभा झाली होती. मात्र त्याचा परिणाम निकालात दिसला नाही. गोव्यातील एकाही मतदारसंघात शिवसेना आणि शिवसेनेचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी मिळाली नाही. तसेच शिवसेनेला एकूण मतदानापैकी केवळ ०.२ टक्के मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या खात्यात १.११ टक्के मते गेली.

    दरम्यान, गोव्यामधील आतापर्यंतच्या कलांनुसार सर्वाधिक ३३.१ टक्के मते घेऊन भाजपाने १९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला २२.९ मतांसह ११ जागांवर आघाडी मिळाली आहे. मगोपला ३, आपला २, गोवा फॉरवर्डला १, रिव्होल्युशनरी गोवन्सला १ आणि अपक्षांना तीन जागांवर आघाडी मिळाली आहे.

    In Goa, voters stopped clock and twisted tail of he tiger’ ; Shiv Sena, NCP’s washing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य