• Download App
    गडचिरोलीत 36 लाखांच्या इनामी 4 नक्षलींना कंठस्नान; तेलंगण सीमेवर एन्काउंटर|In Gadchiroli, 4 naxalites were killed with a reward of 36 lakhs; Encounter on Telangana border

    गडचिरोलीत 36 लाखांच्या इनामी 4 नक्षलींना कंठस्नान; तेलंगण सीमेवर एन्काउंटर

    वृत्तसंस्था

    गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील रेपनपल्लीच्या जंगलात सोमवारी रात्री पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना ठार केले आहे. अहेरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात काल रात्री ही चकमक झाली. सध्या घटनास्थळी पोलिसांचे सर्च ॲापरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या C-60 पथकाने केलेली ही कारवाई मोठे यश मानले जाते.In Gadchiroli, 4 naxalites were killed with a reward of 36 lakhs; Encounter on Telangana border



    नक्षलवाद्यांवर 36 लाखांचे बक्षीस

    दरम्यान, पोलिसांनी खात्मा केलेल्या चार नक्षलवाद्यांवर 36 लाखांचे बक्षीस होते. चकमकीनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र देखील जप्त केली आहेत. यामध्ये Ak-47, एक कारबाईन, २ कट्टे नक्षली साहित्य इत्यादी जप्त करण्यात आले आहेत.

    नदिमार्गे गडचिरोलीत केला प्रवेश

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काह दिवसांपूर्वीच देशात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकी दरम्यान हल्ल्याच्या हेतूने हे नक्षलवादी गडचिरोलीत आले होते. तेलंगणा राज्य कमिटीच्या या नक्षलवाद्यांनी प्रंहिता नदिमार्गे गडचिरोलीत प्रवेश केल्याची माहिती मिळाली होती.

    अतिरेक्यांचा पोलिसांवर गोळीबार

    त्यानंतर C-60 आणि CRPF च्या जलद कृती दलाच्या टीमने शोधमोहीम सुरु केली होती. अतिरिक्त पोलिस अधीक्षक यातिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही शोधमोहिम राबवण्यात आली. पोलिस मदत केंद्र रेपनपल्लीच्या 5 किमी अंतरावर कोलामार्का जंगलामध्ये आज पहाटे शोध घेत असताना 4 अतिरेक्यांनी C60 दलांच्या एका पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. C60 पथकांने देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले.

    ठार केलेल्या नक्षलवाद्यांची नावे

    दरम्यान,डीव्हीसीएम वर्गेश, डीव्हीसीएम मगटू, कुरसंग राजू, कुडिमेट्टा व्यंकटेश अशी ठार झालेल्या चार नक्षलवाद्यांची नावे आहेत.

    In Gadchiroli, 4 naxalites were killed with a reward of 36 lakhs; Encounter on Telangana border

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी