या घटेेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विशेष प्रतिनिधी
भिलवाडा : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समोरच लोकांनी मोदी-मोदी घोषणाबाजी केल्याने मुख्यमंत्र्याची परिस्थिती अवघडल्या सारखी झाल्याची घटना समोर आली आहे. या विचित्र परिस्थितीत अडकलेले मुख्यमंत्री गेहलोत अखेर काहीही न बोलता हसत आपल्या वाहन ताफ्यासह तेथून निघून गेले. In front of Rajasthan Chief Minister Gehlot citizens chanted Modi Modi slogans
भिलवाडा नगरपरिषदेचे महाराणा प्रताप मिशन 2030 संदर्भात उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी सभागृहात पोहोचले होते. या संवाद कार्यक्रमानंतर (६ सप्टेंबरला संध्याकाळी) मुख्यमंत्र्यांचा ताफा भिलवाडा सर्किट हाऊसकडे रवाना झाला. हा ताफा सरस्वती सर्कलवर पोहोचला. येथे तरुणांची संख्या चांगली होती. मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि अभिवादन स्वीकारण्याच्या उद्देशाने गाडीतून बाहेर पडले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने उपस्थित तरुणांना फारसा फरक पडला नाही आणि त्यांनी त्यांच्यासमोर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्र्यांसह तेथे उपस्थित असलेले सुरक्षा कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वाहनाला चारही बाजूंनी घेराव घालण्यात आला. अशा स्थितीत गेहलोतही हसले आणि हात जोडून गाडीत बसून पुढे रवाना झाले.
दरम्यान या घटनेच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राजस्थानमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक आहे आणि जनतेमध्ये गेहलोत सरकारबाबत असलेली नाराजी आता हळूहळू दिसून येत आहे असे म्हणावे लागेल. सामान्य जनताच काय तर काँग्रेस आमदार, नेत्यांकडूनही गेहलोत सरकारला घरचा आहेर दिला जात आहे.
In front of Rajasthan Chief Minister Gehlot citizens chanted Modi Modi slogans
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीर : पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न फसला, दोन दहशतवादी ठार
- नरसिंह राव हिंदुत्ववादी, तर मग सरदार पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, पुरुषोत्तमदास टंडन, के. एम. मुन्शी, कृपलानी हे कोण होते??
- कुणबी दाखला : मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी तपासून आठवडाभरात अहवाल; मुख्यमंत्र्यांची घोषणा
- पंजाबमधील ‘आप’च्या मंत्री अनमोल गगन मान यांच्या विधानामुळे I.N.D.I.A. मोठा धक्का; म्हणाल्या ‘आमचा करार हा…’