विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आपल्या फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्सेलिसला पोहोचले. तिथे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहस आठवले. यासंदर्भात मोदींनी ट्विट करून सावरकरांच्या धाडसाला नमन केले. पण काँग्रेसला मात्र नेहमीप्रमाणे मोदींनी सावरकरांना नमन करणे खटकले.In France’s Marseille, PM Modi recalls Savarkar’s ‘courageous escape’; to inaugurate Indian consulate
पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमेल मॅक्रोन यांच्यासह AI समिटचे सहअध्यक्ष पद भूषविले. त्यानंतर त्यांनी अध्यक्ष इम्युअल मॅक्रोन यांच्या समवेत मार्सेलिसचा दौरा केला. मार्सेलिस मध्ये पंतप्रधान मोदींनी भारताच्या काउंसलेटचे उद्घाटन केले. तिथल्या थर्मो न्यूक्लियर प्रोजेक्टला भेट दिली.
पण त्यापूर्वी मोदींनी मार्सेलिसमध्ये पोहोचताच स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण काढली. याच मार्सेलिस बंदरामध्ये सावरकरांनी मोरिया बोटीतून सागरामध्ये धाडसी उडी घेऊन ब्रिटिशांच्या कब्जातून सुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळच्या फ्रेंच सरकारने आणि मार्सेलिस प्रशासनाने सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यात द्यायला नकार दिला होता. सावरकरांच्या सुटकेच्या मुद्द्यावरून ब्रिटन विरुद्ध फ्रान्स असा आंतरराष्ट्रीय खटला हेगच्या न्यायालयात गाजला होता. भारतीय स्वातंत्र्यवीराविरुद्ध तो पहिला आंतरराष्ट्रीय खटला होता. सावरकरांच्या या धाडसाची आठवण पंतप्रधान मोदींनी मार्सेलिस दौऱ्यात काढली. सावरकरांचे हे साहस अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे ट्विट त्यांनी केले. तत्कालीन फ्रेंच नागरिकांचे त्यांनी आभार मानले.
परंतु काँग्रेसला मोदींनी सावरकरांची आठवण काढणे खटकले. फ्रान्स दौऱ्यात मोदींनी भगतसिंग, लाला लजपत राय, महात्मा गांधींची आठवण काढायला हवी होती. पण त्यांनी सावरकरांची आठवण काढली यातून त्यांनी जगाला भारतीय घाबरट असल्याचा मेसेज दिला, असा आरोप काँग्रेसचे नेते उदित राज यांनी केला. पण उदित राज यांच्या टीकेत काही नवे नव्हते.
In France’s Marseille, PM Modi recalls Savarkar’s ‘courageous escape’; to inaugurate Indian consulate
- Savitribai Phule ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेचे योगदान पर्यटन विभाग विसरला!
- जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, लक्ष्मण हाके यांचा आरोप
- Amanatullah Khan आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणी वाढल्या!
- Ranveer Allahabadia रणवीर अलाहाबादिया, समय रैना सह सर्वांना अश्लील कमेंट बद्दल राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; 17 फेब्रुवारीला दिल्लीत सुनावणी!!