• Download App
    बेटी बचावचा नारा प्रत्यक्षात, देशात पहिल्यांदाचा महिलांची संख्या पुरुषांपेक्ष जास्त|In fact, for the first time in the history of the country, women outnumber men

    बेटी बचावचा नारा प्रत्यक्षात, देशात पहिल्यांदाचा महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढावचा नारा दिला होता. त्याची फळे आता दिसू लागली असून भारतातील महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक झाली आहे. १ हजार पुरुषांच्या तुलनेत १०२१ महिला असे हे प्रमाण झाले असल्याचे राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण- ५ (एनएफएचएस-५)मध्ये आढळून आले आहे.In fact, for the first time in the history of the country, women outnumber men

    लिंग गुणोत्तर (सेक्स रेशो) १ हजारांपलीकडे गेल्यामुळे भारत आता विकसित देशांच्या रांगेत आला असल्याचे आपण म्हणू शकतो, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. एका अधिकाºयाने सांगितले की आर्थिक बाबतीत महिलांचा सहभाग, तसेच लैंगिक भेदभाव आणि विषमता यांच्याशी लढा यांसारख्या महिला सक्षमीकरणाच्या उपाययोजनांना आहे.



    न्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर २०१२-१६ सालच्या ९१९ वरून २०१९-२० साली ९२९ पर्यंत वाढले आहे. यातून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या (पीसी अँड पीएनडीटी अ‍ॅक्ट) अंमलबजावणीसारख्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

    २००५-०६ साली झालेल्या एनएफएचएस-३ सर्वेक्षणानुसार, लिंग गुणोत्तर १०००:१००० असे होते आणि २०१५-१६ साली (एनएफएचएस-४) ते ९९१:१००० इतके घसरले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ नोव्हेंबरला एनएफएचएस-५ चे भारतासाठीचे, तसेच दुसऱ्या टप्प्यातील १४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठीचे निष्कर्ष जाहीर केले. लोकसंख्या, पुनरुत्पादक व बालक आरोग्य, कुटुंब कल्याम, पोषाहार व आरोग्याशी संबंधित इतर मुद्यांवरील प्रमुख निर्देशकांच्या स्वरूपात हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.

    एकूण प्रजनन क्षमता दर (टोटल फर्टिलिटी रेट) २.२ वरून २.० इतका घसरला असल्याच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा(एनएचएफएस-५) अहवाल आहे. . टीएफआरमधील घट- दर महिलेमागे मुलांची सरासरी संख्या- हे असाधारण काम आहे, असे पीएफआयच्या कार्यकारी संचालक पूनम मूत्तरेजा यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एनएफएचएसच्या पाचव्या फेरीतील अहवालाचा संपूर्ण संच बुधवारी जारी केला. आरोग्य आणि कुटुंबकल्याणविषयक मुद्दय़ांची ही सर्वसमावेशक आकडेवारी मानली जाते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. उज्वला गॅससारख्या योजनेमुळे चूल फुंकण्यापासून आणि धुरापासून महिलांना मुक्ती मिळाली. त्याचबरोबर बेटी बचाव, बेटी पढाव अभियाना राबविण्यात आले. गर्भवती महिलांसाठी पोषण योजना, लाडली योजना आदींमुळे महिला सक्षमीकरणाला मदत झाली.

    In fact, for the first time in the history of the country, women outnumber men

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले