• Download App
    मुख्यमंत्र्यांशी चर्चेत धारावी पुनर्विकास आणि अडकलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा पंतप्रधान मोदींकडून आवर्जून उल्लेख!!|In discussion with Chief Minister, Dharavi redevelopment and urgent mention by Prime Minister Modi to speed up the stuck projects

    मुख्यमंत्र्यांशी चर्चेत धारावी पुनर्विकास आणि अडकलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा पंतप्रधान मोदींकडून आवर्जून उल्लेख!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या सर्व कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधानांनी शिंदे कुटुंबीयांशी जिव्हाळ्याने संवाद साधला. पण त्याचवेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. विशेषतः धारावी पुनर्विकास प्रकल्प, एमएमआरडीए मधील अर्धवट प्रकल्पांचा पंतप्रधान मोदींनी आवर्जून उल्लेख केला.In discussion with Chief Minister, Dharavi redevelopment and urgent mention by Prime Minister Modi to speed up the stuck projects



    धारावी पुनर्विकास प्रकल्पातील घरे नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाला गती द्यावी तसेच एमएमआरडीए आणि महाराष्ट्रातले अन्य पडलेले प्रकल्प गतीने सुरू करून जनतेला कालबद्ध कार्यक्रमाद्वारे सुविधा द्याव्यात, अशी आग्रही सूचना पंतप्रधानांनी केली.

    या संदर्भातली माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीनंतर पत्रकारांना दिली. धारावी पुनर्विकास हा आशियातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. झोपडपट्टीवासीयांना 450 स्क्वेअर फुटांची पक्की घरे, तेथे विविध नागरी सुविधा यांचा या प्रकल्पात समावेश आहे. अदानी समूहाची या प्रकल्पात मोठी गुंतवणूक आहे, तसेच मुंबईसाठी हा “गेम चेंजर” प्रकल्प ठरणार आहे.

    या दृष्टीने पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केला, तसेच राजकारण वगळून इतर सर्व प्रकल्पांचा वेगाने पाठपुरावा करण्याची सूचना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केली. यातून माध्यमांनी सेट केलेला मुख्यमंत्री बदलाचा मराठी या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी उधळला.

    In discussion with Chief Minister, Dharavi redevelopment and urgent mention by Prime Minister Modi to speed up the stuck projects

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ammar Yashar : झारखंडमध्ये पकडलेला दहशतवादी अम्मार याशर, ‘इंडियन मुजाहिदीन’नंतर HUT मध्ये होता सक्रिय

    Terrorist Pannu : पहलगाम हल्ल्यानंतर खलिस्तानी दहशतवादी पन्नूने पुन्हा गरळ ओकली

    Chirag Paswan : जातनिहाय जनगणनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींना चिराग पासवान यांचा टोला!