• Download App
    कमलनाथ मुलासह दिल्लीत, 30 आमदारही भाजपमध्ये जाणे शक्य; काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणारे 13 वे माजी मुख्यमंत्री In Delhi with Kamal Nath Mula, 30 MLAs may join BJP

    कमलनाथ मुलासह दिल्लीत, 30 आमदारही भाजपमध्ये जाणे शक्य; काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणारे 13 वे माजी मुख्यमंत्री

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुत्र नकुलनाथ यांच्यासह शनिवारी दुपारी दिल्ली गाठली. पिता-पुत्र सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. कमलनाथ गटाचे अनेक आमदार व नेतेही भाजप प्रवेशासाठी दिल्लीला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. In Delhi with Kamal Nath Mula, 30 MLAs may join BJP

    मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस पक्षाचे 12 आमदार झाले नाराज, त्यांनी गाठली दिल्ली

    चार दशकांहून अधिक काळ काँग्रेस निष्ठावान राहिलेल्या कमलनाथ यांचा अचानक मोहभंग का झाला? त्यांना राज्यसभेत जायचे होते. परंतु काँग्रेसने त्यांचा अपेक्षाभंग केला. कमलनाथ २०२३ च्या विधानसभेत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते. मात्र पराभवानंतर त्यांना काँग्रेसने पदावरून काढले होते. शपथपत्रानुसार कमलनाथ यांच्याकडे १३४ कोटी व नकुलनाथ यांच्याकडे ६६० कोटींची संपत्ती आहे. ते भाजपमध्ये गेल्यास एकाच आठवड्यात काँग्रेस सोडणारे दोन माजी सीएम असतील. १२ फेब्रुवारीला अशाेक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आतापर्यंत १२ माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कमलनाथ पहिल्यांदा १९८० मध्ये छिंदवाडा येथून खासदार म्हणून निवडून आले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना तिसरा मुलगा मानत होत्या.


    मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ मुलासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण!


    दरम्यान, झारखंडमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासह चंपई सोरेन सरकार संकटात आले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसचे 17 पैकी 12 आमदार बंडाच्या तयारीत आहेत. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्काराची धमकी दिली. शनिवारी सायंकाळी त्यापैकी आठ आमदारांनी दिल्लीही गाठली. आणखी दोन आमदार रविवारी दिल्लीत दाखल होतील. तेथे ते हायकमांडसमोर आपले गाऱ्हाणे मांडतील. परंतु आम्ही स्वत:हून हायकमांडकडे जाणार नाहीत. केवळ मध्यस्थीकडे आमचे म्हणणे मांडणार आहोत, असा त्यांचा पवित्रा आहे. काँग्रेसच्या जुन्या चेहऱ्यांनाच संधी दिल्यामुळे हे आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी राजभवनास मंत्र्यांची यादी पाठवल्यापासूनच बंडास सुरुवात झाली. प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी बंडाचा दावा फेटाळला.

    मुख्यमंत्री चंपई सोरेनही दिल्लीत, खरगेंना भेटणार

    सध्याच्या राजकीय स्थितीशी तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री चंपई सोरेन, प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर, झामुमो आमदार सुदिव्य कुमार सोनूही दिल्लीत आले आहेत. चंपई काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेटीच्या बहाण्याने दिल्लीत गेले. राजेश ठाकूर राजकीय हालचाली लक्षात घेऊन काँग्रेसच्या इतर नेत्यांशी सल्लामसलत करतील. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरही चर्चा करतील.

    In Delhi with Kamal Nath Mula, 30 MLAs may join BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??