• Download App
    दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी-पीएनजी ; गॅसच्या दरात सरासरी एक रुपयांनी वाढ। in Delhi-NCR CNG-PNG Gas prices rise by an average of Rs 1

    दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी-पीएनजी ; गॅसच्या दरात सरासरी एक रुपयांनी वाढ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर आता दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशांतर्गत पीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपये, तर सीएनजीच्या दरात ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेल्या किमतींनंतर पीएनजी ३७.६१ रुपये आणि सीएनजी ३५.८६ रुपये किलोवर पोहोचला आहे. आजपासून नवीन दर लागू होतील. in Delhi-NCR CNG-PNG Gas prices rise by an average of Rs 1

    देशभरात मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. बुधवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी, तर मुंबईत ८५ पैशांनी वाढ झाली. या वाढीनंतर अंदमान आणि निकोबारच्या पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.३० रुपये प्रति लिटर आणि डिझेल ७८.५२ रुपयांनी स्वस्त होत आहे. त्याच वेळी, महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग पेट्रोल ११४.८०रुपये आणि डिझेल ९७.४४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.



    मंगळवारी डिझेल-पेट्रोलच्या दरात ८० पैशांसोबतच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही ५० रुपयांची वाढ करण्यात आली. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा दबाव आहे. अशा स्थितीत आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल २0 रुपयांनी महाग होऊ शकते

    in Delhi-NCR CNG-PNG Gas prices rise by an average of Rs 1

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!