• Download App
    दिल्लीत चक्क माकडांना केले क्वारंटाईन : कोरोनाचा संसर्गाच्या भीतीमुळे वनविभागाची खबरदारी|In Delhi Due to Threats Coronavirus Pandemic Monkeys are quarantined

    दिल्लीत चक्क माकडांना केले क्वारंटाईन : कोरोनाचा संसर्गाच्या भीतीमुळे वनविभागाची खबरदारी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याच्या संश्यामुळे वनविभागाकडून चक्क माकडांना पकडून क्वारंटाईन केले जात आहे.
    In Delhi Due to Threats Coronavirus Pandemic Monkeys are quarantined

    कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे दिल्लीत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यात आता माकडांचाही समावेश झाला आहे.



    छतरपूरमध्ये येथील सरदार पटेल कोविड केअर सेंटरमधून ५८ माकडांना पकडले होते. त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले आहे. ही माकडे रुग्णांचे भोजन आणि कपडे उचलून नेत होती,

    असा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आला आहे. या माकडांमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असल्याने खबरदारीचा उपाय माकडांना पकडून क्वारंटाईन केले आहे. दरम्यान, माकडांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलेली नाहीत.

    २० माकडांच्या अँटिजन चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. एकूण ५८ माकडांना पकडून वनविभागाकडे सोपवले होते. या माकडांना तुघलकाबाद येथील पशू संरक्षण केंद्रात ठेवले होते.

    In Delhi Due to Threats Coronavirus Pandemic Monkeys are quarantined

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले