विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये लसीकरण मोहिमेला वेग येण्यासाठी नितीशकुमार सरकारने नागरिकांना घराजवळ लस मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे.In Bihar vaccine Express becoming popular
ग्रामीण भागानंतर आता शहरी भागातील नागरिकांना लशीसाठी रांगेत उभे राहण्याची किंवा लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही.बिहारच्या ग्रामीण भागात ‘लस एक्स्प्रेस’ला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर
आता शहरी भागातील नागरिकांना आता घराजवळच लस उपलब्ध होणार आहे. यानुसार मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी १२१ लस एक्स्प्रेस रवाना केल्या.
या योजनेनुसार घराजवळच लशीचे डोस दिले जाणार आहे.
लस एक्स्प्रेस ही लोकांच्या घरांपर्यंत जाईल आणि तेथे लसीकरण मोहीम राबवली जाईल. अर्थात या माध्यमातून दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.
प्रत्येक गाडीत दोन व्हॅक्सिनेटर आणि एक डेटा एंट्री ऑपरेटर असणार आहे. प्रत्येक गाडीतून दररोज २०० लोकांचे लसीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. बिहारची लोकसंख्या सुमारे तेरा कोटी आहे. त्यामुळे या राज्यात लसीकरण होणा फार आवश्यक आहे.
In Bihar vaccine Express becoming popularIn Bihar vaccine Express becoming popular
महत्त्वाच्या बातम्या
- कॅनडात निवासी शाळेच्या जागेत २१५ मुलांचे सांगाडे, धर्मांतराप्रकरणी पोप यांनी माफी मागावी
- दहावीच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली तर जबाबदारी कोण घेणार, उच्च न्यायालयाचे खडे बोल
- कोरोनिल औषधाबाबत खोटी माहिती दिल्याने रामदेवबाबा वादाच्या भोवऱ्यात, न्यायालयाचे समन्स
- केरळमध्ये भाजप नेत्यांना घेरण्याची डाव्या सरकारची खेळी, अनेकांची होणार चौकशी