• Download App
    बंगालमध्ये तृणमूळ नेता भादू शेखच्या हत्येनंतर बदल्याची आग भडकली; 10 लोकांना जिवंत जाळले!!; मात्र तृणमूळचा वेगळा दावा In Bengal, revenge fire erupted after the assassination of Trinamool leader Bhadu Sheikh

    TMC Violence : बंगालमध्ये तृणमूळ नेता भादू शेखच्या हत्येनंतर बदल्याची आग भडकली; 10 लोकांना जिवंत जाळले!!; मात्र तृणमूळचा वेगळा दावा

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट मध्ये प्रचंड हिंसाचार उसळला असून तृणमूल कॉंग्रेसचा नेता भादू शेख यांच्या हत्येनंतर बदल्याची आग भडकली आणि तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी 10 लोकांना त्यांच्या घरात कोंडून जिवंत जाळले. सोमवारी रात्री ही घटना घडली.In Bengal, revenge fire erupted after the assassination of Trinamool leader Bhadu Sheikh

    या घटनेनंतर पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचाराची देशभर चर्चा सुरू झाली असून सर्वत्र जोरदार निषेध व्यक्त होत आहे. स्थानिक निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यातून रामपुरहाट मधला तृणमूल काँग्रेसचा नेता भादू शेष यांची हत्या झाली. त्यानंतर सोमवारी रात्री भादू शेतीच्या समर्थकांनी 10 लोकांना त्यांच्या घरात कोंडले आणि बाहेरून आग लावून दिली. त्याच वेळी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून भादू शेख समर्थक या घरांत भोवती पहारा देत होते. ही घरे पूर्ण भस्मसात झाल्यानंतरच भादू शेखचे समर्थक तेथून हालले.

    – पोलिसांनी 10 मृतदेह बाहेर काढले

    आज सकाळी पोलिस रामपुरहाट मध्ये पोहोचले तेव्हा त्यांना भस्मसात झालेली घरे दिसली तसेच पोलिसांनी संपूर्ण जळलेल्या अवस्थेतले 10 मृतदेह बाहेर काढले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाचार यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता कोलकात्त्याचे महापौर आणि राज्याचे मंत्री फरहात हकीम यांना रामपूर हटला पाठवले असून पोलिसांना देखील ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

    – तृणमूलचा इन्कार

    मात्र, तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या हिंसाचाराचा इन्कार केला असून स्थानिक नागरिकांच्या घरांमधल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा दावा केला आहे.

    In Bengal, revenge fire erupted after the assassination of Trinamool leader Bhadu Sheikh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य