• Download App
    बेळगावात भाजपला स्पष्ट बहुमत,३६ जागा जिंकल्या; हुबळी- धारवाडमध्ये आगेकूच; कलबुर्गीमध्ये मात्र काटे की टक्कर |In Belgaum municipal corporation election BJP won a clear majority, 36 seats; advance in Hubli- Dharwad; In Kalburgi BJP and congress collision

    बेळगावात भाजपला स्पष्ट बहुमत,३६ जागा जिंकल्या; हुबळी- धारवाडमध्ये आगेकूच; कलबुर्गीमध्ये मात्र काटे की टक्कर

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटकातील बेळगाव, हुबळी- धारवाड आणि कलबुर्गी येथील महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्यात बेळगावमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त करून इतिहास रचला. ५८ पैकी ३६ जागा जिंकल्या आहेत. भाजप हा महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला ९ इतर पक्षांना १३ जागा मिळाल्या आहेत.In Belgaum municipal corporation election BJP won a clear majority, 36 seats; advance in Hubli- Dharwad; In Kalburgi BJP and congress collision

    माजी मुख्यमंत्री बी. एस. ,येडीयूरप्पा हे पदावरून पायउतार झाल्यानंतर आणि नूतन मुख्यमंत्री बोम्मई यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर या निवडणुकांना फारच मोठे महत्व प्राप्त झाले होते. बोम्मई यांच्यासाठी ही ऍसिड टेस्ट होती. त्यामध्ये बेळगावची निवडणूक त्यांच्यासाठी फारच प्रतिष्ठेची होती.



    कारण तेथे भाजपला तगडे आव्हान काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समिती, एआएमआयएम यांचे होते.भाजपने सर्वाधिक ५५ जागा लढवून विजयश्री खेचून आणली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बोम्मई यांची लाट कायम असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते. बेळगावात स्पष्ट बहुमत प्राप्त करून भाजपने इतिहास रचला. स्वतःच्या चिन्हावर ही निवडणूक लढवून स्वबळावर सत्ता प्राप्तीकडे वाटचाल सुरु ठेवली आहे.

     

     

     

     

    हुबळी-धारवाड महापालिकेत ८२ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजप ३४ जागा तर काँग्रेसने २७ जागा जिंकल्या आहेत. आघाडीवर आहे. अपक्ष ६ , जनता दल (एस) १ आणि एआयएमआएमने २ जागा प्राप्त केल्या आहेत.कालबुर्गी येथे भाजप काँग्रेसमध्ये टक्कर असून भाजपने ७, काँग्रेसने ८ तर जनता दल (एस) २ जागी आघाडी घेतली आहे..

    In Belgaum municipal corporation election BJP won a clear majority, 36 seats; advance in Hubli- Dharwad; In Kalburgi BJP and congress collision

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट