पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : भारत-पाक सीमेवर नियंत्रण रेषेला लागून असलेल्या कुपवाडा जिल्ह्याजवळ सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत हे दहशतवादी मारले गेले आहेत. In an encounter in Jammu and Kashmirs Kupwara security forces killed five terrorists
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या गोळाबारात ५ पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.
लष्कराने पुंछ जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला –
लष्कराने गुरुवारी (15 जून) जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि नियंत्रण रेषेजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शोध मोहिमेदरम्यान ही जप्ती करण्यात आली असून त्यात स्टील कोर काडतुसे आणि पाकिस्तानमध्ये बनवलेल्या औषधांचाही समावेश आहे.
भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सतर्क जवानांनी 14 आणि 15 जूनच्या मध्यरात्री कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, असे जम्मूमधील लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले आहे .
In an encounter in Jammu and Kashmirs Kupwara security forces killed five terrorists
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींसाठी डिनर होस्ट करणार बायडेन फॅमिली; पंतप्रधान 21 जून रोजी बायडेन-जिल यांचे पाहुणे असतील, दुसऱ्या दिवशी स्टेट डिनर
- अंतराळातून कसे दिसले बिपरजॉय चक्रीवादळ? सौदीच्या अंतराळवीराने टिपली भयंकर दृश्ये
- उत्तर प्रदेश : दारुल उलूम देवबंदने विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यावर घातली बंदी!
- अहमदाबादमध्ये लँडिंग दरम्यान इंडिगो फ्लाइटला ‘टेल स्ट्राइक’चा फटका