• Download App
    नवी मुंबईतल्या ऐरोलीत पावसाचे धुमशान; अनेक घरात पाणी शिरल्याने धवाधाव। In Airoli, Navi Mumbai Rain water entered houses, shops every where

    नवी मुंबईतल्या ऐरोलीत पावसाचे धुमशान; अनेक घरात पाणी शिरल्याने धवाधाव

    विशेष प्रतिनिधी

    नवी मुंबई : गेल्या तीन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने नवी मुंबईकरांची झोप उडवली आहे. नवी मुंबईतील ऐरोली, दिघा गावात तर सर्वत्र रस्ते, गावे, पाडे, डोंगरावरील घरे, नगरे, नाल्यालगत असणारी वस्ती, खोलगट वस्ती जलमय झाली. साधारण ३ते ५ फूट पाणी साचले होते. आपल्याला दृश्य दिसूनं आली. रस्त्यावर, इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या फ्लोअरपर्यत पाणी साचले होते. दुकानें घरे यांना तर नद्याचे स्वरूप आले होते. संपूर्ण घरातील कपाट, बेड, सोफे, फ्रिज, मशीन, गॅस, सहित कपडे जीवनाश्यक वस्तूंची मोठी नासधूस झाली. In Airoli, Navi Mumbai Rain water entered houses, shops every where

    नागरिक ३ दिवसापासून रात्रदिवस जागून काढत आहेत. पाऊस कमी होण्याचे वाट पाहत आहे, कारण पाणी कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. २६ जुलै २००५ सारखी परिस्थिती पुन्हा होते की काय ? अशी भीती पसरली. कारण २०० ते २५० मिमी पाऊस पडून रेकॉर्ड झाले. मुंबई पालिका सोबतच नवी मुंबई पालिकेने पावसाळी कामे केल्याचा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. नागरिकांमध्ये प्रचंड रोष, राग, संताप उसळत आहे. मते मागायला या, तेव्हा दाखवूच असे नागरिक बोलत होते.

    • नवी मुंबईतल्या ऐरोलीत पावसाचे धुमशान
    • मुसळधार पावसाने पाणी घराघरांत शिरले
    • पाण्याच्या धास्तीमुळे रात्रीचा दिवस करण्याची वेळ
    • पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची कामे केल्याचा देखावा
    • दुकानें, घरे यांना तर नद्याचे स्वरूप
    • इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या फ्लोअरपर्यत पाणी
    • नागरिकांमध्ये प्रचंड रोष, राग, संताप
    • मते मागायला या, तेव्हा दाखवूच, अशी रोखठोक भूमिका

    In Airoli, Navi Mumbai Rain water entered houses, shops every where

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार