• Download App
    लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका, केंद्राने सीबीआयला खटला चालवण्याची दिली परवानगी In a major blow to Lalu Prasad Yadav the Center allowed the CBI to prosecute the case

    लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका, केंद्राने सीबीआयला खटला चालवण्याची दिली परवानगी!

    या अगोदर ‘ED’ने जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केलेली आहे.

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि  राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना आज मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याविरोधात खटला चालवण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीआयला परवानगी दिली आहे. In a major blow to Lalu Prasad Yadav the Center allowed the CBI to prosecute the case

    यानंतर सीबीआयने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाला सांगितले की, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्ध नोकरी घोटाळ्यात नव्या आरोपपत्राला गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.

    या अगोदर १ ऑगस्ट रोजी  अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ED’ने जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केलेली आहे. ही मालमत्ता लालूंची पत्नी राबडी देवी, मुलगी मिसा भारती, मुलगी हेमा यादव यांचे पती विनित यादव, हेमा यादव यांचे सासरे शिवकुमार यादव यांची आहे.

    लालू यादव 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री असताना त्या काळात जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता. ही नोकरी गट ड मध्ये देण्यात आली होती.

    In a major blow to Lalu Prasad Yadav the Center allowed the CBI to prosecute the case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Harivansh Nominated : हरिवंश राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार बनले, उपसभापती होऊ शकतात; कार्यकाळ 2032 पर्यंत

    114 Rafale Jets : 114 नवीन राफेल स्वदेशी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असतील; 18 जेट फ्रान्समधून येतील, 96 भारतात बनवले जातील