विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताची लोकसंख्या १३६ कोटी आहे. मात्र, देशात या लोकसंख्येची १० टक्केही करदाते नाहीत. 2019-20 या आर्थिक वर्षात भारतात 8.22 कोटी करदाते होते. यामध्ये वैयक्तिक आणि कॉपोर्रेट दोन्ही करदात्यांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली.In a country of 136 crores, there are only 8.22 crore taxpayers, not even 10 per cent
सीतारामन म्हणाल्या, २०२०-२१ च्या असेसमेंट वषार्साठी एकूण करदात्यांची संख्या ८ कोटी २२ लाख ८३ हजार ४०७ इतकी आहे. देशाची अंदाजे एकूण लोकसंख्या १३६.३० कोटी इतकी आहे. करदात्यांच्या या संख्येत अशा व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांनी आयकर आणि कॉपोर्रेट कर भरला आहे आणि ज्यांनी एकतर रिटर्न भरला आहे किंवा ज्यांच्या बाबतीत टीडीएस कापला गेला आहे.
सरकारने नॉन-फाइलर्स मॉनिटरिंग सिस्टम लागू केली आहे, जी संभाव्य फसवणूक केलेल्या व्यक्ती/संस्था शोधून काढण्यासाठी इन-हाउस माहितीसह व्यवहार डेटाचे विश्लेषित करते. यामध्ये कोणतेही कर न भरता आयकर रिटर्न दाखल न करता केलेले जास्त किंमतीचे आर्थिक व्यवहार केले आहेत अशा लोकांना शोधणे सोपे जाईल.
कर विभागाचा प्रयत्न संभाव्य नॉन-फायलर्स शोधून त्यांना कराच्या कक्षेत आणण्याचा आहे. यासाठी, आउटरीच प्रोग्रामद्वारे वॉलेंटरी कम्प्लायंसला प्रोत्साहन देणे, मास मीडियाद्वारे जागरूकता निर्माण करणे आणि फिल्ड अथॉरिटीजद्वारे रिजन स्पेसिफीक धोरणे विकसित करणे यासारख्या उपयांचा समावेश आहे.
त्यात आयकर रिटर्नची प्रक्रिया सुलभ करणे आणि फाइलिंग प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी वैधानिक नोटीस जारी करणे यासारखे उपक्रम देखील आहेत. याशिवाय आयटीआर भरण्यासाठी आणि थकबाकी कर भरण्यासाठी करदात्यांना कर विभागाकडून ई-मेल आणि एसएमएस रिमांयडर देखील पाठवली जातात, असे सीतारामन यांनी सांगितले.
In a country of 136 crores, there are only 8.22 crore taxpayers, not even 10 per cent
महत्त्वाच्या बातम्या
- Congress Debacle : काँग्रेस कार्यकारिणी गांधी परिवाराची “पाठ राखी”; पण सोनियांनी उगारली 5 प्रदेशाध्यक्षांवर काठी!!
- प्रविण दरेकर यांच्यावरील कारवाई सुडबुद्धीने नाही ; महेश तपासे यांचा दावा
- रखडलेल्या प्रकल्पांच्या यादीत पुण्यातील ४,८०० सदनिका
- हिजाबशिवाय महाविद्यालयात जाणार नाही उडुपी येथील मुस्लिम मुलींचा निर्धार