विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हवाईदल प्रमुखांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ चोळले; operation sindoor दरम्यान भारत आणि पाकिस्तानची 5 विमाने पाडल्याचे उघडपणे सांगितले.
माजी हवाई दल प्रमुख एअर ची मार्शल एल. एम. कात्रे व्याख्यानमालेत विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरचे सविस्तर प्रेझेंटेशन केले. त्यामध्ये त्यांनी ओपन सोर्स मधले सगळे फोटो दाखविले. त्याचवेळी त्यांनी राजकीय नेतृत्वाने संरक्षण दलांना दिलेल्या संपूर्ण स्वातंत्र्याची विस्ताराने माहिती दिली. पण महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ चोळले.
भारताने पाकिस्तानात 21 ठिकाणी हल्ले चढविले. त्यांचे 9 हवाई तळ उद्ध्वस्त केले. रहीम यार खान, नूर खान, सरगोधा, भुलारी इथल्या हवाई तळांवरचे विमानांचे हँगर नष्ट केले. त्या हँगर मध्ये पाकिस्तानने अमेरिकेकडून विकत घेतलेली f16 विमाने होती. त्यातली काही विमाने नष्ट झाली. पण त्यापलीकडे जाऊन हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग यांनी जे सांगितले, ते देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ चोळणारेच होते. पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले करायचा प्रयत्न केला, पण भारतीय हवाई दलाने आणि एस 400 रडार सिस्टीमने पाकिस्तानची 5 विमाने पाडली, असे अमर प्रीत सिंग म्हणाले.
– f16 विमानांचे हँगर नष्ट
भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय नेतृत्वाने आत्तापर्यंत ऑपरेशन सिंदूर विषयी जेवढी माहिती दिली, त्यामध्ये अमेरिकन बनावटीची f16 विमाने ठेवलेले हँगर नष्ट झाल्याचे त्याचबरोबर पाकिस्तानची 5 विमाने पाडल्याचे कुणी सांगितले नव्हते. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धबंदीचे 30 पेक्षा जास्त वेळा श्रेय घेतले, ते देखील भारतीय नेतृत्वाने मान्य केले नव्हते.
पण आज भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी सगळ्याच्या पलीकडे जाऊन अमेरिकन विमाने ठेवलेले पाकिस्तानचे हँगर नष्ट केल्याचे सांगितले. त्याचबरोबर भारतानेच पाकिस्तानची 5 विमाने पाडली, असेही सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध बंदीच्या वक्तव्याला त्यांनी दुजोरा दिला नाही, त्या उलट पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सने फोन केल्यानंतरच भारताने स्वतःच्या इच्छेनुसार हल्ले थांबविले, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळले गेले.
In 80 to 90 hours of war, we were able to achieve so much damage that it was clear to them that if they continue, AP Singh
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi राहुल गांधींचे ‘मतचोरी’चे आरोप फोल, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे
- Municipal Commissioner : पालिका आयुक्तांनी जरा अती केलं का ?
- Hard Facts : ट्रम्पशी पंगा झाला म्हणून अमेरिकेशी सगळे संबंध संपलेले नाहीत, भारत चीनच्या कह्यात देखील गेलेला नाही!!
- Khalid Ka Shivaji : ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर वादग्रस्त संवाद हटवणार