विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – अफगाणिस्तानातून सैन्यमाघारी घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वागत केले. विदेशी फौजा तैनात असताना अफगाणिस्तानात शांतता नांदूच शकत नाही, ही पाकिस्तानची फार पूर्वीपासूनची भूमिका असल्याचेही इम्रान यांनी सांगितले.Imran welcome Taliban and Usa decsion
‘सर्वसमावेशक राजकीय’ तोडगा काढला तरच अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण होईल, असा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
अफगाणिस्तानातील सर्व राजकीय घटकांना एकत्र आणले तरच देशात शांतता निर्माण होऊ शकते. तसेच, देशाचा विकास होण्यासाठी अमेरिकेकडून सातत्याने आर्थिक मदतीचा ओघ चालू राहणेही आवश्य क आहे,’ असे कुरेशी यांनी ब्लिंकन यांना सांगितले. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठीही हीच वेळ असल्याचेही कुरेशी यांनी सांगितले.
Imran welcome Taliban and Usa decsion
महत्वाच्या बातम्या
- राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल
- ‘पेगॅसस’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दिलासा, संवेदनशील माहिती देण्याची गरज नाही
- राष्ट्रीय महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी नेट्टा डिसूझा, सुस्मिता देव यांनी राजीनामा दिल्याने घाईघाईत नियुक्ती
- माजी वनमंत्री संजय राठोड अडचणीत, शरीरसुख मागितल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा जबाब नोंदविला
- उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण, आईला भेटण्यासाठी आले होते अधिवेशन अर्ध्यावर सोडून