• Download App
    इम्रान खान यांचे तिसरे लग्नही संकटात, माजी पतीला बायको कंत्राटे मिळवून देत असल्याने वाद|Imran Khan's third marriage is also in crisis as his ex-husband is getting wife contracts

    इम्रान खान यांचे तिसरे लग्नही संकटात, माजी पतीला बायको कंत्राटे मिळवून देत असल्याने वाद

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : एका बाजुला पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात असल्याने पंतप्रधान इम्रान खान यांचे राजकीय करीअर संकटात सापडले आहे. त्याचबरोबर कौटुंबिक पातळीवरही इम्रान खान संकटात सापडले आहेत. माजी पतीला सरकारी कंत्राटे मिळवून देत असल्याचे समोर आल्यामुळे झशलेल्या वादातून त्यांची तिसरी बायको घर सोडून गेली आहे.Imran Khan’s third marriage is also in crisis as his ex-husband is getting wife contracts

    पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार इम्रान खान आणि त्यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांच्यात भांडण झाले आहे. त्यामुळे बुशरा इस्लामाबाद येथील इम्रान यांचे आलिशान घर सोडून लाहोरला राहायला गेली आहे. त्याचबरोबर इम्रान यांनी आपल्या घरातील सर्व कर्मचारीही बदलले आहेत.



    बुशरा यांची इम्रानसोबत पहिली भेट 2015मध्ये एका पोटनिवडणुकी दरम्यान झाली होती असं म्हटलं आहे. 2015मध्ये झालेल्या एका पोटनिवडणुकीत त्यांची ओळख झाली होती. त्यावेळी 40 वर्षांच्या असलेल्या बुशरा यांना पाच मुले होती. त्यांचे पती कस्टम अधिकारी तर वडील केंद्रीय मंत्री होते.

    बुशरा आणि इम्रान यांच्यात गेल्या वर्षीपासून वाद सुरू आहे. त्यांचे माजी पती खावर मनेका हे बुशरा पंतप्रधानांच्या बायको झाल्याचा फायदा घेऊन पंजाब प्रांतात कोट्यवधी रुपयांची कंत्राटे मिळवित होते. याची तक्रार पंजाबमधील अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांच्याकडे केली होती.

    बुजदार यांनी हे इम्रान खान यांना सांगितल्यावर त्यांच्या आणि बुशरा यांच्यात वाद वाढू लागला. त्यानंतर बुशरा यांची एक जवळची मैत्रीण फराह आझमी यांच्या पतीचे सरकारी विभागाशी संबंध उघड होऊन कोट्यवधी रुपयांचा घोटाळश पुढे आला.

    इम्रान खानचं पहिलं लग्न जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याबरोबर झालं होतं. दोघांना 2 मुलंही आहेत. 2004मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2014मध्ये इम्रान यांचं लग्न टीव्ही अँकर रेहाम खान यांच्याशी झालं होतं. रेहामचे आईवडील पाकिस्तानी आहेत, तर रेहामचा जन्म लीबियातला आहे. हे लग्न 10 महिनेच टिकू शकलं.

    Imran Khan’s third marriage is also in crisis as his ex-husband is getting wife contracts

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य