• Download App
    पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांना मोठा धक्का, उमेदवारी रद्द Imran Khans candidature canceled by Election Commission of Pakistan

    पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांना मोठा धक्का, उमेदवारी रद्द

    एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते

    विशेष प्रतिनिधी

    कराची : पाकिस्तान निवडणूक आयोगाने शनिवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शनिवारी सांगितले की, 2024 मध्ये देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे नामांकन नाकारण्यात आले आहे. Imran Khans candidature canceled by Election Commission of Pakistan

    पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी इम्रान खान यांचे उमेदवारी रद्द होणे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इम्रान खान यांच्या पक्ष- पीटीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दोन्ही मतदारसंघातून दाखल केलेले उमेदवारी अर्ज फेटाळले आहेत.


    Imran Khan Arrest : माझी अटक हा ‘London plan’चा भाग – इम्रान खान यांचा मोठा दावा!


    इम्रान खान यांना एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते, तेव्हापासून ते राजकीय आणि कायदेशीर लढाईत अडकले आहेत. पाकिस्तानचे विद्यमान सरकार आपला छळ करत असल्याचा आरोप ते वारंवार करत आहेत.

    इम्रान खान यांच्यावर 2018 ते 2022 या काळात पंतप्रधानपदावर असताना सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना ऑगस्टमध्ये तीन वर्षांची शिक्षा झाली होती.

    Imran Khans candidature canceled by Election Commission of Pakistan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र