प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर एकापाठोपाठ एक हल्ले सुरू केले आहेत. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांनी मोदींवर हुकूमशहा असल्याचा आरोप केला आहे, तसेच जनतेच्या शक्तीपुढे अहंकाराला झुकावे लागले अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.Imposing an emergency by suppressing the “they” movement; We respectfully repeal laws
या प्रतिक्रियांवरून हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले, की काँग्रेसवाल्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासून बघावा. ते आंदोलकांना दडपून देशावर आणीबाणी लादणारे आहेत. 1975 मध्ये असेच आंदोलन झाले होते. त्यावेळी जयप्रकाश नारायण नेते होते आणि संपूर्ण क्रांती हे त्या आंदोलनाचे नाव होते.
पण पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते आंदोलन दडपले. नेत्यांना तुरुंगात टाकले आणि देशावर आणीबाणी लादली. पण आम्ही तसे केले नाही. जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा आम्ही दडपत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा आदर राखत कृषी कायदे मागे घेतले आहेत.
अनिल विज पत्रकार परिषदेत बोलताना एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, की सोनिया गांधी आणि त्यांच्या मुलांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी आधी काँग्रेसचा इतिहास तपासून बघावा. आणि आपल्या खानदानाने काय केले ते पहावे.
त्यांनी आंदोलन दाबून, दडपून देशावर आणीबाणी लादली पण आम्ही जनतेच्या मतांचा आदर करत कायदे मागे घेतले. हा काँग्रेसच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला फरक आहे, याकडे अनिल विज यांनी आवर्जून लक्ष वेधले आहे.
Imposing an emergency by suppressing the “they” movement; We respectfully repeal laws
महत्त्वाच्या बातम्या
- नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले, म्हणाले- इम्रान खान माझे मोठे भाऊ, मला खूप प्रेम दिले!
- हिंदी बिग बॉस मध्ये अभिजित बिचुकलेची होणार एन्ट्री
- कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी
- “कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर….” ; अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा