वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात चोरी करणाऱ्यांना कठोरातले कठोर शासन करा!!, अशी मागणी करणारे जाहीर पत्र राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांनी आज प्रसिद्धीला दिले. त्या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. Ram Mandir
महंत नृत्यगोपालदास गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत त्यामुळे त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कालच रुग्णालयात जाऊन महंत नृत्यगोपालदास यांची भेट घेतली होती.
– हस्ताक्षरातले पत्र
त्यानंतर महंत नृत्यगोपालदास यांनी आज आपल्या हस्ताक्षरात पत्र लिहून ते प्रसिद्धीला दिले. त्यामध्ये त्यांनी राम जन्मभूमी मंदिरातील चोरी बद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून ज्या लोकांनी राम जन्मभूमी मंदिरात चोरी करायचे पाप केले, त्यांना कठोरातले कठोर शासन करायची मागणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्याकडे केली. त्याचवेळी महंत नृत्यगोपालदास यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी हे दोन्ही नेते राम मंदिरातील देणगी चोरांना सजा देतील, असाही विश्वास व्यक्त केला.
पण त्याचवेळी त्यांनी राम मंदिरातील चोरी बद्दल जे राजकारण सुरू आहे, त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अयोध्येतले राम मंदिर हे कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेचे आणि आस्थेचे स्थान आहे. तिथल्या चोरीच्या मुद्द्यावरून कुणी राजकारण करू नये, अशी अपेक्षा महंत नृत्यगोपालदास यांनी व्यक्त केली.
Impose the strictest possible punishment on those who committed theft at the Ram Mandir.
महत्वाच्या बातम्या
- Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा तिसरा दिवस, 9 जुलैपर्यंत नोंदणी स्लॉट पूर्ण; प्रशासन म्हणाले- नोंदणी नसेल तर प्रवास टाळा
- Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला
- हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; नकारात्मकतेमुळे कम्युनिस्ट संपले, सकारात्मक विचारांमुळे संघ टिकला!!
- राम मंदिरात चोरी की दरोडा??; नृपेंद्र मिश्रांच्या वक्तव्याला आलोक कुमार यांचा छेद!!