विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरच्या जलवाहतूक प्राधिकरणाने काश्मिरमधील झेलम नदीत जलपर्यटनाला चालना देण्यासाठी पहिली अलिशान नौका आयात केली आहे. या ३० आसनी ‘बस बोट’ची सध्या झेलम नदीत श्रीनगरमधील लासजन आणि चट्टाबल वीरदरम्यान चाचण्या सुरू आहेत.Imported bus boat in Zelum river
या बस बोटीशिवाय एका खासगी कंपनीनेही सफरीसाठी १२ आसनी नौका व बचाव नौका उपलब्ध करून दिली आहे. ‘बस बोट’ आणि बचाव नौका न्यूझीलंडच्या मॅक कंपनीकडून खरेदी केली आहे. तर १२ आसनी नौका अमेरिकेतून आणली आहे.
बस बोट मध्ये वातानुकूलित यंत्रणेसह संगीत व दूरचित्रवाणीचाही आनंद पर्यटकांना घेता येईल. त्याचप्रमाणे, त्यात दहा ते बाराजणांना बैठकही घेता येईल.काश्मिरची ओळख आणि वारसा असलेली झेलम नदीतील अनेक दशकांच्या वाहतूक संस्कृती पुनरु्ज्जीवित करण्याचा यामागील उद्देश आहे.
त्याचप्रमाणे, पंतप्रधान विकास कार्यक्रमातंर्गत निधी दिल्या जाणाऱ्या ‘स्वदेश दर्शन’ या योजनेतून नव्या नौकांची खरेदी करण्यात आली आहे.
Imported bus boat in Zelum river
महत्त्वाच्या बातम्या
- तुमचा जन्म झाला तेव्हा मी भारत-चीन सीमेवर होतो, कॅ. अमरिंदरसिंग यांनी सिध्दू यांना सुनावले
- विरोधकांनी दिले पाकिस्तानच्या हातात कोलीत, भारतावर हेरगिरीचा आरोप करत पाकिस्तानचे पंतप्रधान
- गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळविला, आर्थिक उदारीकरणावर मुकेश अंबानी यांचे मत
- भास्कर समुहाची सीबीडीटीने केली पोलखोल : २२०० कोटी रुपयांचे बनावट व्यवहार, पैसे फिरविण्यासाठी १०० वर अधिक कंपन्या, त्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या नावावर