वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राज्यसभेतला गदारोळ, १२ खासदारांचे निलंबन या दिवसभराच्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलत देशभरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ews) आरक्षणासंदर्भात शिफारशी करण्यासाठी एक समिती गठित केली आहे.Important steps of the Center in political turmoil; Committee formed for reservation for economically weaker sections; Term of three weeks
तीन सदस्यांच्या या समितीचे नेतृत्व भारताचे माजी केंद्रीय अर्थ सचिव अजय भूषण पांडे यांच्याकडे देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या समितीला शिफारशी करण्यासाठी दीर्घ काळाची किंवा बेमुदत अशी मुदत दिलेली नसून येत्या तीन आठवड्यांमध्ये या समितीने शिफारशी करून त्या केंद्र सरकारला सादर करायच्या आहेत.
देशभरातील आर्थिक दुर्बल घटकांची माहिती केंद्र सरकार समितीला पुरविणार आहे आणि त्यावर आधारित आरक्षणा संदर्भातल्या विविध शिफारशी या समितीकडून केंद्र सरकारने अपेक्षित केल्या आहेत. तीन आठवड्यांच्या मुदतीत या शिफारशी केंद्र सरकारकडे आल्या की त्यावर केंद्र सरकार विचार करून त्याची ताबडतोब सुरू करण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असणाऱ्या समाजाच्या आशा आणि अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.
निवडणुकांचे गणित
अर्थात यामागे महत्त्वाचे राजकीय गणित असे हे विसरून चालणार नाही. उत्तर प्रदेशसह महत्त्वाच्या पाच राज्यांच्या निवडणुका 2022 च्या सुरुवातीला आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने समाजातल्या सर्व घटकांसाठी काही ना काही तरी लाभ देण्याचे ठरविले आहे.
यामध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा समावेश आहे. अर्थात या संबंधी नेमलेल्या समितीला तीनच आठवड्यांची मुदत दिल्याने तिने केलेल्या शिफारशींवर केंद्र सरकार लवकरात लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.
Important steps of the Center in political turmoil; Committee formed for reservation for economically weaker sections; Term of three weeks
महत्त्वाच्या बातम्या
- रामजन्मभूमी खटल्याचा निकाल धर्माच्या नव्हे तर कायदे आणि संविधानाच्या आधारावर, रंजन गोगोई यांनी केले स्पष्ट
- जमीनीवरील राजकारणी, वेदना सहन करत महिला खासदार सायकलवर जाऊन प्रसुतीसाठी झाल्या दाखल
- नव्या वर्षात १२ सुट्या वाया! शनिवार-रविवारी आल्याने होणार कर्मचाऱ्यांचे नुकसान
- सायरस पूनावाला सोडून जगातील सगळ्या धनाड्यांना ओमिक्रॉन कोरोना व्हायरस झटका, अब्जावधी रुपयांचे नुकसान