• Download App
    मराठा आरक्षणासाठी महत्वाची बातमी, तामिळनाडूमधील वण्णियार समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने ठरविले रद्दबादल|Important news for Maratha reservation, Supreme Court cancels reservation of Vanniyar community in Tamil Nadu

    मराठा आरक्षणासाठी महत्वाची बातमी, तामिळनाडूमधील वण्णियार समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने ठरविले रद्दबादल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मराठा आरक्षणाची मागणी करणाºयांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तमिळनाडूतील वण्णियार या अतिमागासवर्गीय समाजाला वेगळी वागणूक देण्याचा काहीही ठोस आधार नसल्याचे सांगून, या समाजाला सरकारी नोकºयांतआणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात देण्यात आलेले १०.५ टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द ठरवले.Important news for Maratha reservation, Supreme Court cancels reservation of Vanniyar community in Tamil Nadu

    वण्णिकुला क्षत्रिय समुदायाला अतिमागासवर्गीय गटांतील ११५ समुदायांपासून वेगळे मानण्यासाठी त्यांचे एका गटात वर्गीकरण करण्यासाठी कुठलाही ठोस आधार नसल्याचे आमचे मत झाले आहे. त्यामुळे, राज्य सरकारने २०२१ साली केलेला हा कायदा घटनेच्या १४, १५ व १६ या कलमांचे उल्लंघन करणारा आहे.



    परिणामी आम्ही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत आहोत, असे खंडपीठाने सांगितले. जात हा अंतर्गत आरक्षणाचा आधार होऊ शकतो हे खरे असले, तरी तो एकमेव आधार असू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या मुद्दय़ावर व्यापक खंडपीठाने विचार करावा असे आपल्याला वाटत नसल्याचे सांगून, हे प्रकरण व्यापक खंडपीठाकडे वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी नकार दिला होता.

    वण्णियार समाजाला देण्यात आलेले आरक्षण घटनबाह्य असल्याचे सांगून ते रद्द ठरवणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाºया तमिळनाडू सरकार, पट्टाली मक्कळ कच्छी (पीएमके) व इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.

    Important news for Maratha reservation, Supreme Court cancels reservation of Vanniyar community in Tamil Nadu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे