• Download App
    Gujarat गुजरातेत तोतया ईडी टीमचा सराफा दुकानावर

    Gujarat : गुजरातेत तोतया ईडी टीमचा सराफा दुकानावर छापा; 11 अटकेत, 1 फरार

    Gujarat

    वृत्तसंस्था

    गांधीधाम :Gujarat  गुजरातमध्ये बॉलीवूड ‘स्पेशल २६’ च्या धर्तीवर काही ठकांनी गांधीधाममध्ये राधिका ज्वेलर्स व घरावर छाप्याची कारवाई करून २२.२५ लाख रोकड व दागिने लुटले. या टोळीने ईडीचे अधिकारी असल्याचा बनाव करून २ डिसेंबरच्या सकाळी ही कारवाई केली. दुपारपर्यंत त्यांचे कारवाईचे नाटक सुरू होते. त्यानंतर म्होरक्या म्हणाला, चुकीचे इनपुट मिळाले. तुमच्याकडे कारवाई करायची नव्हती. त्यानंतर या टोळीने पोबारा केला.Gujarat



    ही टोळी गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दागिन्यांची पडताळणी करून बघितली. तेव्हा त्यांना सोन्याची बिस्किटे, ब्रासलेट गायब असल्याचे आढळले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात बनावट ईडीच्या टीममधील एक महिला दागिने चोरताना दिसून आली. पोलिसांनी म्होरक्यासह ११ जणांना अटक केली. एक आरोपी अद्यापही फरार आहे. म्होरक्या अहमदाबाद डीआरएमचा भाषांतरकार शैलेंद्र देसाई (४०) आहे. शैलेंद्रने अंकित तिवारी नावाने ईडी अधिकाऱ्याचे आेळखपत्र तयार केले होते. यात भुजचा पत्रकारही आहे.

    पाच वर्षांपूर्वी येथेच छाप्याची कारवाई

    राधिका ज्वेलर्सवर ५ वर्षांपूर्वी ईडीची कारवाई झाली होती. म्हणून टोळीने दुकानास निशाणा बनवले. १०० कोटींचा माल मिळेल, असा टोळीचा अंदाज होता. बनावट छाप्यासाठी १५ दिवस तयारी केली.

    Impersonator ED team raids bullion shop in Gujarat; 11 arrested, 1 absconding

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले