• Download App
    Iran-Israel इराण - इजरायल संघर्षाचा भारतीय विमान सेवेवर परिणाम; अमेरिका, युरोपला जाणारी विमाने इतरत्र वळवली किंवा परत बोलावली

    इराण – इजरायल संघर्षाचा भारतीय विमान सेवेवर परिणाम; अमेरिका, युरोपला जाणारी विमाने इतरत्र वळवली किंवा परत बोलावली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : इजरायलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने आपली हवाई हद्द बंद केली. त्याचा परिणाम भारतीय विमानसेवेवर झाला असून अमेरिका आणि युरोप ला जाणारी आणि तिकडून येणारी सर्व विमाने एअर इंडियाने ती इतरत्र वळवली आहेत किंवा ती परत बोलवली आहेत. एकंदरीत 14 विमाने वळवली किंवा परत बोलावली अशी माहिती एअर इंडियाने पत्रकाद्वारे दिली.

    मुंबई – लंडन, मुंबई – न्यूयॉर्क, मुंबई – वॉशिंग्टन, वॉशिंग्टन – मुंबई, दिल्ली – वॉशिंग्टन, व्हॅन्कुवर – दिल्ली, न्यूयॉर्क – दिल्ली शिकागो – दिल्ली, बेंगलोरु – लंडन आदी विमानांचा यात समावेश आहे. ही विमाने युरोपमधल्या अन्य विमानतळांकडून आपल्या नियोजित ठिकाणांवर पोहोचतील किंवा ती आपल्या मूळ ठिकाणी परत येतील, असे सांगण्यात आले आहे.

    इजरायलने इराण मधल्या अण्वस्त्र तळांवर हल्ला करून तिथले अति वरिष्ठ अधिकारी मारले त्यानंतर इराण इजरायल वर प्रतिहल्ला करायच्या बेतात आहे. या पार्श्वभूमीवर इराणने आपली हवाई हद्द सील केली आहे. त्यामुळे बऱ्याच देशांना नागरी विमाने इतरत्र वळवावी लागली आहेत.

    Impact of Iran-Israel conflict on Indian air services

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Chauhan : CDS म्हणाले- ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही पाकिस्तानला हरवले; सैन्य ही अशी जागा, जिथे घराणेशाही नाही

    Delhi High Court : कुटुंबाशी संबंध तोडण्याचा पतीवर दबाव हे मानसिक क्रौर्य; दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही