• Download App
    Rain Alert : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अलर्ट; पुढील 4 दिवस कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज । IMD Weather Alert for major rainfall in Mumbai Thane Palghar and Heavy Rainfall for Konkan Marathwada in Maharashtra

    IMD Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अलर्ट; पुढील 4 दिवस कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

    IMD Weather Alert : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील 48 तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापैकी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD Weather Alert for major rainfall in Mumbai Thane Palghar and Heavy Rainfall for Konkan Marathwada in Maharashtra


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील 48 तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापैकी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    कुठे होणार अतिवृष्टी?

    राज्यात 7 सप्टेंबर रोजी ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालनासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

    कोकणात ऑरेंज अलर्ट

    कोकण पट्ट्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    कुठे पडणार मध्यम स्वरूपाचा पाऊस?

    सातारा, पुणे, रायगड, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    IMD Weather Alert for major rainfall in Mumbai Thane Palghar and Heavy Rainfall for Konkan Marathwada in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!