• Download App
    नोटांवर लक्ष्मी - गणेशाच्या प्रतिमा : केजरीवालांनी आधी वक्तव्य करून आजमावल्या प्रतिक्रिया, आता लिहिले मोदींना पत्रImages of Lakshmi-Ganesha on currency notes: Kejriwal's first statement tried reactions

    नोटांवर लक्ष्मी – गणेशाच्या प्रतिमा : केजरीवालांनी आधी वक्तव्य करून आजमावल्या प्रतिक्रिया, आता लिहिले मोदींना पत्र

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय करन्सी नोटांवर महात्मा गांधी यांच्याबरोबरच लक्ष्मी गणेशाच्या प्रतिमा असाव्यात असे वक्तव्य करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आधी देशभरातल्या प्रतिक्रिया आजमावल्या आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहून अधिकृतरित्या तशी मागणी केली आहे. Images of Lakshmi-Ganesha on currency notes: Kejriwal’s first statement tried reactions

    केजरीवालांचे दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात वक्तव्यानंतर देशभरात प्रत्येक राजकीय पक्षाला त्या संदर्भात भूमिका घ्यावी लागली भाजप आणि काँग्रेस यांनी सुरुवातीला त्यांची खिल्ली उडवली पण सोशल मीडियात त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्यानंतर केजरीवालांनी हे पत्र लिहिले आहे.

    या पत्रात केजरीवाल म्हणतात, की देशातील 130 कोटी लोकांची इच्छा आहे की, भारतीय चलनावर एका बाजूला गांधी आणि दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा.

    शुक्रवारी पंतप्रधानांना पाठवलेले पत्र ट्विट करत केजरीवाल यांनी लिहिले आहे की, मी 130 कोटी भारतीयांच्या वतीने पंप्रधानांना पत्र लिहून विनंती केली आहे की, महात्मा गांधी आणि लक्ष्मी, गणपतीचा फोटो भारतीय चलनी नोटांवर लावावे. पत्रात केजरीवाल यांनी म्हटले आहे की, आज देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही भारताची गणना विकसनशील आणि गरीब देशांमध्ये केली जाते. आज आपल्या देशात इतके गरीब का आहेत? पुढे त्यांनी असेही लिहिले आहे की, एकीकडे आपल्या सर्व देशवासीयांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे आणि दुसरीकडे आपल्याला देवाच्या आशीर्वादाचीही गरज आहे जेणेकरून आपले प्रयत्न फलदायी ठरतील.

    योग्य धोरण, मेहनत आणि देवाचा आशीर्वाद याच्या संगमातूनच देशाची प्रगती होईल. त्यांनी जाहीरपणे मांडलेल्या या मागणीला लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकांमध्ये त्याची प्रचंड उत्सुकता आहे. याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

    आता या पत्रावर पंतप्रधान मोदी अथवा केंद्र सरकार नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Images of Lakshmi-Ganesha on currency notes: Kejriwal’s first statement tried reactions

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य