विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशभरातील सर्वसाधारण गटांत उत्कृष्ट संस्था म्हणून मद्रास येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) बाजी मारली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या सहाव्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूटशनल रँकिंग फ्रेमवर्क’ मानांक २०२१ ची यादी जाहीर केली.IIT Madras is on top in list
यामध्ये संशोधन, सर्वसाधारण, विद्यापीठ, व्यवस्थापन, महाविद्यालय, फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एआरआयआयए आणि कायदे या गटांचा समावेश आहे. उत्कृष्ट संशोधन संस्थेत बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
याच गटात आयआयटी मुंबईने तिसरे स्थान मिळविले आहे. देशभरातील देशातील पहिल्या दहा अभियांत्रिकी संस्थांमध्ये आठ ‘आयआयटी’ आणि दोन राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांचा (एनआयटी) यांचा समावेश आहे. उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेचा मान आयआयटी मद्रासला मिळाला.
उत्कृष्ट ‘बी स्कूल’ गटात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (भारतीय व्यवस्थापन संस्था- आयआयएम), अहमदाबादची निवड झाली तर जामिया हमदर्द ही औषध निर्माण अभ्यासक्रमातील (फार्मसी) उत्कृष्ट संस्था ठरली.महाविद्यालयीन गटात दिल्लीतील ‘मिरांडा हाउस’ने प्रथम मानांक मिळविले. दुसऱ्या स्थानी दिल्लीतील महिलांसाठीचे लेडी श्रीराम महाविद्यालय व तिसरा क्रमाक चेन्नईतील ‘लॉयला’ला मिळाला.
IIT Madras is on top in list
महत्त्वाच्या बातम्या
- सिंगापूर : सायबर हल्ल्यात ८०हजार लोकांची वैयक्तिक माहिती झाली लीक , भारतातील अनेक खासगी बँकांचे ग्राहकही ठरले बळी
- सलाम म्हणणे बेकायदेशीर असल्यास यापुढे तसे कोणालाही म्हणणार नाही, दिल्ली दंगलीतील आरोपीची न्यायालयाला विचारणा
- दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात सुरू होणार प्रचाराची रणधुमाळी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा सभा होणार आहेत.
- गूगल आणि जिओने भारतातील स्मार्टफोन लॉन्च करण्यास केला विलंब