विशेष प्रतिनिधी
कानपूर : ओमायक्रॉनबाबत आयआयटी कानपूरच्या संशोधकांचा थरकाप उडविणार अंदाज व्यक्त केला आहे. ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, ती फेब्रुवारीच्या प्रारंभी कळस गाठू शकते, असे भाकीत आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी एका गणिती प्रारूपाच्या आधारे केले आहे.IIT Kanpur researchers’ shocking prediction of Omaicron, third wave of corona to reach peak in early February
आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी संशोधनपर लेखात म्हटले आहे की, ओमायक्रॉनमुळे जगात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोना साथीच्या प्रसाराबाबत भाकीत करण्यासाठी गॉसियन मिक्चर या पद्धतीचा संशोधकांनी आधार घेतला.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील स्थितीचा तपशील तपासून त्यानंतर तिसऱ्या लाटेच्या शक्यतेचा वेध घेण्यात आला. ही लाट डिसेंबरच्या मध्यापासून सुरू होऊ शकते, असे या संशोधकांनी म्हटले होते.
भारतामध्ये ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतरच्या स्थितीचा अभ्यास करून आयआयटी कानपूरच्या गणित व सांख्यिकी विभागातील संशोधकांनी तिसऱ्या लाटेबद्दल काही आडाखे मांडले आहेत. ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट १५ डिसेंबरपासून सुरू होऊन ३ फेब्रुवारीला कळस गाठण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
आयआयटी कानपूरच्या संशोधकांपेक्षा वेगळे मत कोरोना संदभार्तील सुपरमॉडेल कमिटीने व्यक्त केले होते. या कमिटीचे प्रमुख व आयआयटी हैदराबादमधील प्राध्यापक विद्यासागर यांनी सांगितले की, ओमायक्रॉनमुळे पुढच्या वर्षी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र ती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्र स्वरूपाची असेल.
IIT Kanpur researchers’ shocking prediction of Omaicron, third wave of corona to reach peak in early February
महत्त्वाच्या बातम्या
- खोट्या अॅट्रॉसिटींना बसणार चाप, साक्षीदार नसेल तर गुन्हा ठरू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- दुबईहून परतलेल्या सर्व प्रवाशांना सक्तीचे 7 दिवस होम क्वारंटाइन
- अतरंगी रे मुव्ही रिव्ह्यू : ना अक्षय कुमार ना सारा अली खान, अतरंगी रे मध्ये धनुष चकाचक झळकतोय
- Omicron in Maharashtra : ओमिक्रॉनचा धोका-राज्यात नवी नियमावली जाहीर;काय आहेत नवे नियम?
- आनंदाची बातमी : २०१९ मध्ये MPSC उत्तीर्ण ४१३ विद्यार्थ्यांना २०२१ मध्ये मिळाले नियुक्ती पत्र, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण