• Download App
    धर्मसंसदेतील चिथावणीखोर वक्तव्यांबद्दल आयआयएमचे विद्यार्थी, प्राध्यापकांचे पंतप्रधानांना पत्र। IIM students wrote letter to PM modi

    धर्मसंसदेतील चिथावणीखोर वक्तव्यांबद्दल आयआयएमचे विद्यार्थी, प्राध्यापकांचे पंतप्रधानांना पत्र

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – देशभरात वाढलेला जातीय हिंसाचार आणि द्वेषमूलक भाषणांबाबत चिंता व्यक्त करतानाच आयआयएममधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहितानाच याविरोधात उघडपणे बोलण्याची विनंती केली आहे. IIM students wrote letter to PM modi

    अशा घटनांवर खुद्द पंतप्रधानच गप्प असल्याने द्वेषमूलक चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांची हिंमत वाढत चालली असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या देशाचे विभाजन करू पाहणाऱ्या शक्तींविरोधात तुम्ही कठोर भूमिका घ्यायला हवी, या लोकांपासून देशाचे ऐक्य आणि सर्वसमावेशकतेला मोठा धोका असल्याचा आरोपही या पत्रामध्ये करण्यात आला आहे.



    हरिद्वार येथील धर्मसंसदेत करण्यात आलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना हे पत्र लिहिण्यात आले आहे. द्वेषमूलक भाषणे आणि जात- धर्मांचा आधार घेत एका विशिष्ट समुदायावर हल्ला करण्याची चिथावणी दिली जात असेल तर ते अस्वीकारार्ह आहे. भारतीय राज्यघटना देखील व्यक्तीला तिच्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देते, असे असताना सध्या देशभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

    IIM students wrote letter to PM modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे