• Download App
    काम करायचे नसेल तर काँग्रेस मधून चालते व्हा! राहुल गांधी यांचा बोलघेवड्या कार्यकर्त्यांना इशारा|If you don't want to work, run from Congress!Rahul Gandhi's warning to talkative activists

    काम करायचे नसेल तर काँग्रेस मधून चालते व्हा! राहुल गांधी यांचा बोलघेवड्या कार्यकर्त्यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी

    द्वारका : काँग्रेसचे जे कार्यकर्ते आणि नेते कठोर परिश्रम करण्यास उत्सुक नाहीत ते पक्ष सोडू शकतात,अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. If you don’t want to work, run from Congress!Rahul Gandhi’s warning to talkative activists

    वर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी सुरू असताना, येथील काँग्रेस चिंतन शिबिरात गांधी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून कार्ये आणि पक्षाची भूमिका निश्चित करणे हे चिंतन शिबिराचे उद्दिष्ट आहे. 25 वर्षांहून अधिक काळ गुजरात मध्ये काँग्रेस सत्तेत नाही. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 182 सदस्यांच्या विधानसभेत 77 जागा जिंकल्या होत्या.



    गुजरातमध्ये कार्यकर्त्यांच्या पक्षातील योगदानाबाबत आणि “डिस्कनेक्ट” बद्दल बोलताना त्यांनी कामचुकारपणा करणाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. ते म्हणाले की, पक्षाकडे असे लोक आहेत जे चोवीस तास काम करतात. पक्षात चैतन्य आणतात. काही असेही आहेत, जे एसीमध्ये बसतात. टाईमपास करतात आणि लांबलचक भाषणे देतात.

    गांधी म्हणाले, कोण बोलते आणि कोण काम करते यावरून काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. एकीकडे काँग्रेसमध्ये असे लोक आहेत जे २४ तास जमिनीवर, तळागाळापर्यंत काम करतात. पक्षात चैतन्य आणतात. तर दुसरीकडे एसी केबिनमध्ये बसणारे लोक आहेत. ते वेळ चांगला घालवतात आणि लांबलचक भाषणे देतात.

    जे कार्यकर्ते आणि नेते कठोर परिश्रम करण्यास उत्सुक नाहीत ते पक्ष सोडू शकतात, असे संकेतही त्यांनी दिले. ते म्हणाले, आम्हाला गुजरातच्या लोकांना काँग्रेसची अशी यादी दाखवायची आहे, की राज्याला मार्ग दाखवण्यासाठी लोक उपयोगी आहेत. दुसरीकडे, पक्षात त्रास निर्माण करणारे लोक आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

    If you don’t want to work, run from Congress!Rahul Gandhi’s warning to talkative activists

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य