विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वाहतूक भंग करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. आता केवळ मोठी शहरेच नाहीत तर छोट्या शहरांमध्येही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास जबरी दंड होणार आहे. त्यासाठी तयारी करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने राज्य सरकारांना दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरे आहेत.If you break the traffic rules , the invoice will come home in 15 days
वाहनचालकांनी वाहतूक नियम मोडल्याचे इलेक्ट्रॉनिक रुपात रेकॉर्ड केले जाणार आहे. 15 दिवसांत त्याचे चलन वाहन मालकाला पाठविले जाणार आहे. वाहतूक नियंत्रण संस्था, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय मोटर वाहन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याद्वारे हे ई चलन पाठविले जाणार आहे. याशिवाय राज्यांना जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड डिटेक्शन कॅमेरे आदी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय याची माहिती लोकांना देण्यासही बजावण्यात आले आहे.
नियम मोडल्यापासून पंधरा दिवसांच्या आत हे चलन पाठविले जाईल. हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड चलन भरल्यानंतर नष्ट केले जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखांहून जास्त आहे, तिथे. सर्व राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि महत्वाच्या रस्त्यांवर, चौकात ही यंत्रणा उभी केली जाणार असून त्याचा इशारा देणारे फलकही स्पष्टपणे लावण्यात यावेत असे आदेशात म्हटले आहे.
मंत्रालयाने सांगितले की, मोटर वाहन नियमांमध्ये बदल केले त्यांचा उद्देश देशभरात नियमांचे उल्लंघन कमी करणे आणि वाहतुकीचे नियम लागू करण्यामध्ये पारदर्शकता आणणे हा त्याचा उद्देश आहे.
नोटिफिकेशनमध्ये जवळपास 132 शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 19 शहरे आहेत. उत्तर प्रदेशातील 17 आणि आंध्र प्रदेश 13 शहरे आहेत.
या शहरांमध्ये स्पीड कॅमेरा, क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरा, स्पीड गन, बॉडी कॅमेरा. डॅशबोर्ड कॅमेरा, ऑटो नंबर प्लेट रेकग्निशन , वेट इन मशीन (हकट) आदी उपकरणे लावण्यात येणार आहेत. काही शहरांमध्ये आधीपासूनच ई-चलन सिस्टम सुरु आहे. तिथेही ही उपकरणे वाढवण्यात येणार आहे. यामुळे चलनांची संख्या वाढणार आहे. असे झाल्यास ही चलने पाठविण्यासाठीची वेळ वाढणार आहे. आता त्याच दिवशी किंवा दुसºया दिवशी चलन येते.
If you break the traffic rules , the invoice will come home in 15 days
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रायव्हेट पार्ट’मधून महिलांनी केली किलोभर सोन्याची तस्करी
- आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी
- हिंदू प्रतीकांना विराेध करण्यात दलितांनी वेळ दवडू नये ; सरस्वती सन्मान विजेते शरणकुमार लिंबाळे
- जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा, हक्कानी नेटवर्कचा सुरक्षा समितीत भारताकडून पर्दाफाश; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सफल अध्यक्षता