विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रमाणापेक्षा जास्त मेसेज पाठविले जात असतील तर ते ओळखण्यासाठी व्हॉटसअॅपने तंत्रज्ञान विकसित केले आहे.व्हॉटसअॅपन१५ मे ते १५ जून या कालावधीत तब्बल २० लाख भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. २०१९ पासून बंद करण्यात येणाºया खात्यांचे प्रमाण वाढले आहे. जगभरात दरमहा सरासरी ८० लाख खाती बंद करण्यात येत आहेत.If You are sending too many messages, your account may be closed, technology developed by WhatsApp, 20 lakh Indian accounts closed for various reasons
गेल्या महिनाभराच्या कालावधीत कंपनीला ३४५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कंपनीकडून नव्या आयटी नियमांनुसार मासिक तक्रार निवारण अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीने अहवालात दिलेल्या माहितीनुसार, धोकादायक, तसेच अश्लील संदेश पाठविण्याच्या प्रकारांवर प्रतिबंध घालण्याकडे जास्त लक्ष देण्यात आले.
तसेच प्रमाणापेक्षा जास्त मेसेज पाठविणाऱ्या खात्यांनाही ओळखण्यासाठी तंत्रज्ञान अद्ययावत करण्यात आले आहे. सुमारे ९५ टक्के खात्यांवर बल्क मेसेजिंग सुविधेचा गैरवापर करण्यात आल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे.
नव्या नियमांनुसार ५० लाखांहून अधिक युझर्स असलेल्या सोशल आणि डिजिटल प्लॅटफॉर्म कंपन्यांना दरमहा तक्रार निवारण अहवाल सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या तक्रारी, तसेच त्यावर करण्यात आलेली कारवाई याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.
If You are sending too many messages, your account may be closed, technology developed by WhatsApp, 20 lakh Indian accounts closed for various reasons
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मिरात बकरीदला गाय व उंट यांच्या कुर्बानीवर बंदी, सरकारकडून आदेश जारी
- महामारीदरम्यान देशात UPIच्या माध्यमातून वाढले डिजिटल व्यवहार, गतवर्षी झाले 41 लाख कोटींचे ट्रान्झॅक्शन
- टी-सिरीजच्या भूषण कुमारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, काम देण्याच्या आमिषाने 30 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप
- Maharashtra SSC Result 2021 : परीक्षेविना जाहीर झालेला राज्याचा १०वीचा निकाल ९९.९५%; कोकण विभाग १००%, तर नागपूरचा सर्वात कमी