• Download App
    ‘’जर राष्ट्रपतींबाबत एवढंच प्रेम होतं, तर...’’ संसद उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांना गुलाम नबी आझाद यांचा टोला! If there is so much love for the President why field a candidate against him Ghulam Nabi Azad

    ‘’जर राष्ट्रपतींबाबत एवढंच प्रेम होतं, तर…’’ संसद उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांना गुलाम नबी आझाद यांचा टोला!

    विक्रमी वेळेत नवी संसद भवन निर्माण केल्याबद्दल विरोधकांनी सरकारचे कौतुक केले पाहिजे,  असंही आझाद यांनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या हस्ते  २८ मे रोजी देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. मात्र या सोहळ्याला काँग्रेस आणि समविचारी पक्ष विरोध करत आहेत. तर, त्यांच्या विरोधावर आता काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. If there is so much love for the President why field a candidate against him Ghulam Nabi Azad

    गुलाम नबी आझाद म्हणाले, विरोधी पक्ष विरोध का करत आहेत, हे समजत नाही. त्यांना  तर देशाला नवी संसद मिळत असल्याचा आनंद झाला पाहिजे.  मी दिल्लीत असतो तर नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहिलो असता. विक्रमी वेळेत नवी संसद भवन निर्माण केल्याबद्दल विरोधकांनी सरकारचे कौतुक केले पाहिजे,  मात्र ते तर सरकारवर टीका करत आहेत. उद्घाटन  कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांना माझा ठाम विरोध आहे.

    गुलाम नबी आझाद म्हणाले, नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये केंद्रीय संसदीय मंत्री असताना त्यांनी नवीन संसद बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. ते म्हणाले, मी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी नवीन संसद बनवण्याबाबत चर्चा केली होती, नकाशाही बनवला होता, पण तेव्हा आम्ही बनवू शकलो नाही.

    याशिवाय ते म्हणाले की,  ‘’देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची लोकसंख्या पाचपट वाढली आहे, त्यानुसार लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली आहे. म्हणूनच संसदेची नवी इमारत बांधावी लागली. आझाद पुढे म्हणाले, मी नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या अनावश्यक वादाच्या विरोधात आहे. विरोधकांकडे मुद्यांची कमतरता नाही, ते चुकीचे मुद्दे मांडत आहेत आणि विरोधकांचे राष्ट्रपतींबद्दल इतके प्रेम असेल तर त्यांच्या विरोधात उमेदवार का उभा केला?’’

    If there is so much love for the President why field a candidate against him Ghulam Nabi Azad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार