• Download App
    Advantage modi च आहे, तर राहुलजींनी भेदक सर्व्हिस करून फायदाच काय झाला??if there is advantage modi , then what rahul gandhi and congress got by targeting modi in parliament??

    Advantage modi च आहे, तर राहुलजींनी भेदक सर्व्हिस करून फायदाच काय झाला??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – Advantage modi च आहे, तर राहुलजींनी भेदक सर्व्हिस करून फायदाच काय झाला??, असा प्रश्न विचारायची वेळ कालच्या राहुल गांधींच्या आणि आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील भाषणांनी आणली. if there is advantage modi , then what rahul gandhi and congress got by targeting modi in parliament??

    काल राहुल गांधींनी लोकसभेत जे तुफान भाषण केले, त्याची पंतप्रधान मोदींनी आज जोरदार खिल्ली उडवली. जणू राहुल गांधींनी अदानी – हिंडेनबर्ग प्रकरणात पंतप्रधानांचे नाव घेऊन नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर देण्याची संधीच उपलब्ध करवून दिली. टेनिसच्या भाषेत बोलायचे झाले, तर राहुल गांधींनी काल भेदक सर्व्हिस जरूर केली, पण आज मोदींनी ती सर्व्हिस भेदून Advantage modi च असल्याचे दाखवून दिले.

    भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी खरंच अख्खा देश फिरले. त्यांनी या यात्रेत त्यांना दिसलेला भारत जर खऱ्या अर्थाने संसदेत मांडला असता, तर मोदींची ते खरंच कोंडी करू शकले असते. राहुल गांधींना भारत फिरताना देशाची काहीच प्रगती दिसली नसेल, असे म्हणणे अप्रमाणिकपणाचे ठरेल. त्यामुळे त्यांनी देशाच्या प्रगतीची उदाहरणे मांडून जर त्यातल्या उणिवा दाखविल्या असत्या, तर मोदींची निश्चित कोंडी झाली असती. कारण मोदींनी सिरियस डिबेट जिंकल्याचे उदाहरण क्वचितच सापडेल.



     

    पण राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेतील सकारात्मक उदाहरणे मांडून त्यातल्या उणिवा नेमक्यापणाने मांडण्याऐवजी थेट मोदींना घेरण्याचा सरधोपट खरं म्हणजे घिसापिटा मार्ग वापरला. खरंतर हा पराभूत फॉर्म्युला आहे. आणि इथंच मोदींना परत काँग्रेसवर विशेषतः राहुल गांधींवर वार करण्याची संधी मिळाली. आपल्या वक्तृवाच्या बळावर त्यांनी ती संधी जोरकसपणे साधून घेतली.

    काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाला चांगले जरूर म्हटले. पण त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नसल्याची टीका केली. पण पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणाचा आणि आधीच्या पंतप्रधानांच्या भाषणांचा नीट विचार केला, तर कोणत्या पंतप्रधानांनी त्या त्या वेळच्या विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना प्रत्युत्तरे दिली आहेत, उलट सगळ्यांनी आपल्या वक्तृवाच्या बळावर तर फड जिंकायचा प्रयत्न केल्याचेच दिसते. मग मोदींनी आज तेच केले असेल, तर त्यांना कसा काय दोष देता येईल??, उलट राहुल गांधींनी भेदक सर्व्हिस जरूर केली, पण मोदींनी ती सर्व्हिस भेदून Advantage modi च असल्याचे दाखवून दिले. मग राहुल गांधी, काँग्रेस आणि विरोधकांच्या हाताला काय लागले??

    if there is advantage modi , then what rahul gandhi and congress got by targeting modi in parliament??

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य