एकता ही राजस्थानची सर्वात मोठी संपत्ती असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस तुमची संपत्ती खास लोकांना वाटण्याचे षड्यंत्र रचत आहे. याआधी मी राजस्थानला आलो तेव्हाही असाच मुद्दा मांडला होता. तसेच, काँग्रेस सरकार सत्तेत असते तर आज देशाच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट झाले असते. असंही मोदींनी म्हटलं आहे. IF the Congress government had been in power then today serial blasts would have every corner of the country Prime Minister Modi has said.
टोंक येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘आज रामभक्त हनुमानाच्या जन्मोत्सवाचा पवित्र दिवस आहे. संपूर्ण देशाला हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. राजस्थानला हे चांगलेच ठाऊक आहे की सुरक्षित राष्ट्र आणि स्थिर सरकार देशासाठी खूप महत्त्वाचे आहे. 2014 असो किंवा 2019, राजस्थानने एकत्र येऊन देशात भाजपचे मजबूत सरकार बनवण्यासाठी आशीर्वाद दिला. तुम्ही सर्व 25 जागा भाजपला दिल्या होत्या.
एकता ही राजस्थानची सर्वात मोठी संपत्ती असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आणि लक्षात ठेवा, जेव्हा-जेव्हा आपली फाळणी झाली, तेव्हा देशाच्या शत्रूंना फायदा झाला. आताही राजस्थानचे विभाजन करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे राजस्थानने सतर्क राहण्याची गरज आहे. जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, या 10 वर्षांत तुम्ही पाहिले आहे की एक स्थिर आणि प्रामाणिक सरकार देशाच्या विकासासाठी खूप काही करू शकते. असंही मोदींनी बोलून दाखवलं.
सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, 2014 मध्ये तुम्ही मोदींना दिल्लीत सेवा करण्याची संधी दिली. यानंतर देशात असे निर्णय घेण्यात आले, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. जरा विचार करा, 2014 नंतरही काँग्रेसचे सरकार दिल्लीत सत्तेवर राहिले असते तर काय झाले असते. काँग्रेस असती तर जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या सैन्यावर दगडफेक झाली असती, काँग्रेसचे सरकार असते तर आजही सीमेपलीकडील शत्रूंनी आमच्या जवानांचा शिरच्छेद केला असता. काँग्रेस असती तर आमच्या सैनिकांना वन रँक वन पेन्शन मिळाली नसती आणि आमच्या माजी सैनिकांना १ लाख कोटी रुपये मिळू शकले नसते. असे ते म्हणाले.
IF the Congress government had been in power then today serial blasts would have every corner of the country Prime Minister Modi has said.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींना हायकोर्टाचा दणका, बंगालमध्ये 24 हजार शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द; 8 वर्षांचे पगारही वसूल करण्याचे आदेश
- भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याबद्दल काँग्रेसची बोंबाबोंब, पण काँग्रेस सकट अनेक पक्षांचे खासदार निवडून आलेत बिनविरोध!!
- पवार म्हणतात, भाजप नको, दादांसकट सगळे चालतील, पण पवार भाजपला का घाबरतात??; आणि ते फक्त भाजपलाच घाबरतात का??
- कर्नाटकात जबदरस्तीने धर्मांतराची घटना उघडकीस, दोघांना अटक!