• Download App
    कोणी आम्हाला छेडले नाही तर त्याला सोडणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा|If someone teases us, we will not let him go, warns Defense Minister Rajnath Singh

    कोणी आम्हाला छेडले नाही तर त्याला सोडणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ: आम्ही कोणाला छेडणार नाही. पण कोणी आम्हाला छेडले तर त्याला सोडणार नाही. कोणत्याही देशाच्या एक इंच जमिनीवर आम्ही कब्जा केलेला नाही. पण त्यांनी आमची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, तर त्यालाही सोडणार नाही, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानला दिला आहे.If someone teases us, we will not let him go, warns Defense Minister Rajnath Singh

    राजनाथ सिंह म्हणाले, एक भक्कम देश असल्याचे भारताने जगाला दाखवून दिले आहे. आम्हाला आमच्या शेजाऱ्याशी चांगले संबंध हवे आहेत. भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही, की कोणत्याही परकीय भूमीवर कब्जा केला नाही. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ही भारताची संस्कृती आहे.



    पण काहींना ते समजत नाही. ही त्यांची सवय आहे की स्वभाव हे आपल्याला माहीत नाही. दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. त्याला कडक संदेश दिला आहे.आपण पश्चिम सीमेवरील आपल्या शेजाऱ्याला स्पष्ट संदेश दिला आहे, असे सांगून राजनाथ सिंह म्हणाले,

    सीमा ओलांडली तर आम्ही केवळ सीमेवरच प्रत्युत्तर देणार नाही तर त्याच्या हद्दीत घुसून सर्जिकल आणि हवाई हल्ले करू. आपला आणखी एक शेजारी आहे. ज्याला काही गोष्टी समजत नाहीत. जगातील कोणत्याही देशाने आमची एक इंचही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला तर भारत चोख प्रत्युत्तर देईल.

    If someone teases us, we will not let him go, warns Defense Minister Rajnath Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये