विशेष प्रतिनिधी
गाझियाबाद : समाजवादी पक्षाच्या सरकारने फक्त कब्रिस्तान (मुस्लिम दफनभूमी) साठी सीमा भिंती बांधण्यासाठी पैसा खर्च केला. मात्र, आमच्या सरकारने तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे विकसित करण्यासाठी काम केले, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी केला.If Samajwadi Party spends for cemetery boundary wall then our government develops shrines and temples, alleges Yogi Adityanath
गाझियाबादच्या मोदीनगर मतदारसंघात एका मेळाव्याला संबोधित करताना योगी बोलत होते. ते म्हणाले, मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी कब्रिस्तानच्या सीमा भिंती बांधणे ऐवढीच फक्त विकासकाम केले आहे ते म्हणजे . ते कब्रिस्तानचा विचार करतात तर आम्ही तिर्थक्षेत्रे विकसित करण्याचा विचार करतो.
समाजवादी पार्टी पक्ष सत्तेवर आल्यास रहिवाशांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन देत आहेत. तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की 2017 पूर्वी वीज उपलब्ध होती का? सपा आणि बहुजन समाज पक्षाने अंधारात राहणे पसंत केले.
त्याचबरोबर समाजवादी पक्षाने दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांची पेन्शनही आपल्या कार्यकर्त्यांच्या नावावर वळविली. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या सरकारने दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे, रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम विकासकामे केली. डबल इंजिन सरकारने उत्तर प्रदेशात अनेक विकासकामे हाती घेतली आहेत.
If Samajwadi Party spends for cemetery boundary wall then our government develops shrines and temples, alleges Yogi Adityanath
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारण्यांची खुशामतखोरी कशाला? खाम नदी प्रकल्पाला माझे नाव नको… भाजप राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी औरंगाबाद आयुक्तांना लिहिले खरमरीत पत्र
- निर्मला सीतारामन यांच्या परखड प्रत्युत्तरानंतर काँग्रेसने चिदंबरम यांना उतरवले बजेटच्या मैदानात!!
- Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेले डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय?, काय-काय होणार फायदे? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
- Budget 2022 : इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकार आणणार बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी, काय होणार फायदे? वाचा सविस्तर…