वृत्तसंस्था
नवी दिल्ली : OBC, SC, ST मुस्लिम आणि यादव एकत्र आले आणि त्यांनी एकत्रितपणे मतदान केले, तर भाजपचे स्वप्न भंगेल, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी हिंदू समाजात फूट पाडणारे व्यक्तव्य केले आहे.If Muslims, OBCs, SCs, STs and Yadavs come together, BJP’s dream will be shattered; Kapil Sibal’s statement to divide Hindus!!
मतदानाच्या सहाव्या टप्प्याच्या सुरुवातीला कपिल सिब्बल यांचे हे वक्तव्य आल्याने काँग्रेसची नेमकी मानसिकता काय आहे??, हे उघड्यावर आले आहे. मतदानाच्या सहाव्या टप्प्यात दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड आणि पंजाब मध्ये 58 जागांवर मतदान होत आहे.
या पार्श्वभूमीवर मतदानाच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचा आढावा घेताना कपिल सिब्बल म्हणाले, देशातली जनता राम मंदिर या मुद्द्यावर बोलत नाही तो मुद्दा केव्हाच मागे पडला आहे आता जनता बेरोजगारी महागाई या विषयावर बोलते त्याच विषयावर आता पुढच्या सगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होईल असे दिसते आहे.
भाजपने 400 पारचा नारा देऊन फक्त आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले, पण जनतेने तो नारा सिरियसली घेतला नाही. उलट जनता त्या नाऱ्याची खिल्ली उडवत आहे. OBC, SC, ST, मुस्लिम आणि यादव यांनी एका विशिष्ट पॅटर्ननुसार मतदान केले, तर भाजपचे 400 पारचे स्वप्न पूर्णपणे भंगून जाईल, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल यांनी वेगवेगळ्या समाज घटकांची नावे घेऊन त्यांचा एक विशिष्ट पॅटर्न मतदानासाठी वापरण्याचा इरादा व्यक्त करून काँग्रेसला हिंदू समाजात कशा पद्धतीने फूट पाडायची आहे, हेच दाखवून दिले आहे.
If Muslims, OBCs, SCs, STs and Yadavs come together, BJP’s dream will be shattered; Kapil Sibal’s statement to divide Hindus!!
महत्वाच्या बातम्या
- भीषण अपघात: वैष्णोदेवीला जाणारी मिनी बस ट्रकला धडकली, एकाच कुटुंबातील सात ठार
- टपाल विभागाची बंपर भरती! ग्रामीण डाक सेवकाच्या तब्बल 40000 जागा लवकरच
- अजितदादांचे अखेर परखड बोल; कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असूदे, कारवाई होणारच!!
- ‘जर जिवंत राहिलो तर…’ भाजपचे फरिदकोटचे उमेदवार हंसराज हंस का झाले भावूक?