Tuesday, 6 May 2025
  • Download App
    शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घरापर्यंत आली असती; अमित शांहांनी शिवसृष्टीच्या लोकार्पणात सांगितली यशवंतरावांची आठवणIf it was not for Shivaji Maharaj, the border of Pakistan would have reached our house

    शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घरापर्यंत आली असती; अमित शांहांनी शिवसृष्टीच्या लोकार्पणात सांगितली यशवंतरावांची आठवण

    प्रतिनिधी

    पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगताना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आठवण सांगितली. If it was not for Shivaji Maharaj, the border of Pakistan would have reached our house

    छत्रपती शिवाजी महाराज हे सत्ता लालसी नव्हते, तर त्यांना स्वधर्म, स्वभाषा आणि स्वदेश यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे होते, असे सांगून अमित शाह म्हणाले, की छत्रपतींविषयी संशोधन करताना यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणातला एक उल्लेख सापडला. यशवंतराव म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची बॉर्डर शोधायला दूर जावे लागले नसते. पाकिस्तानची बॉर्डर तुमच्या आमच्या घरापर्यंत आली असती. यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणातला भाषणातले उद्गार मी सांगतो आहे. यावर मी वेगळी टिप्पणी करणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व काय होते?, हेच यातून स्पष्ट होते, असे अमित शहा यांनी सांगितले.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतूनच अटकते कटक आणि अहद तंजावर तहद पेशावर स्वराज्य निर्माण होऊ शकले. शिवाजी महाराजांनी स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषा यांची जपणूक करत या देशातील संस्कृती संवर्धन केली. गोव्यातील सप्त कोटेश्वर मंदिरासह अनेक मंदिरे परकीयांच्या आक्रमणापासून मुक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रेरणेतूनच विविध धर्मस्थळे मुक्त करून त्यांच्या विकासाचे काम सध्या सुरू आहे, याची आठवण अमित शाह यांनी करून दिली.

    बाबासाहेब शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील श्री वसृष्टीच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते.

    If it was not for Shivaji Maharaj, the border of Pakistan would have reached our house

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    देशभरात मॉक ड्रिलचे आदेश, भारतात शेवटचा सायरन कधी वाजला होता?

    हे घ्या नीट समजावून, Mock drill म्हणजे नागरी संरक्षणाचा सराव, युद्धाची घोषणा नव्हे!!

    Pakistan Mock drill : पाकसोबतच्या तणावादरम्यान केंद्राचा मोठा निर्णय; 7 मे रोजी मॉक ड्रिलचे आदेश

    Icon News Hub