वृत्तसंस्था
भोपाळ : जित्याजागत्या भारत मातेचे तुकडे करून स्वातंत्र्य मिळवणे हे योग्यच नव्हते. हिंदू समाजाला हिंदू म्हणूनच टिकून राहायचे असेल तर खंडित भारताला पुन्हा अखंड बनवावेच लागेल, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.If Hindus want to remain Hindus, then the fragmented India has to be made intact again
गेल्या काही दिवसांपासून डॉ. मोहन भागवत हे अखंड भारताच्या संकल्पनेविषयी अनेक अंगांनी परखड मते व्यक्त करत आहेत. त्याच बरोबर अखंड भारत संकल्पनेची व्यापक भूमिका देखील मांडत आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत आजपासून तीन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर, रामललाचेही दर्शन घेणार
भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना आज डॉ. भागवत यांनी पुन्हा एकदा अखंड भारता संदर्भातल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, की हिंदू समाजासाठी भारत देश हा केवळ जमिनीचा तुकडा नाही. हिंदू समाजाच्या दृष्टीने ही आमची भारतमाता मातृभूमी आहे. त्यामुळे देशाचे स्वातंत्र्य मिळवताना हिंदु समाजाला जो खंडित भारत स्वीकारावा लागला तो पुन्हा अखंड बनवावाच लागेल. इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवताना रक्तपात होऊ नये. तो टाळावा यासाठी त्या वेळच्या राजकीय धुरीणांनी देशाची फाळणी स्वीकारली. परंतु जो रक्तपात टाळण्यासाठी ही फाळणी स्वीकारली त्यापेक्षा जास्त कितीतरी जास्त रक्तपात फाळणी स्वीकारल्यामुळे झाला.
आणि नंतरही गेली 75 वर्षे देशाला रक्तपात सहन करावाच लागतो आहे. फाळणी ही दुर्दैवी घटना होती. तिचे परिमार्जन आपण पुन्हा अखंड भारत बनवूनच करू शकतो, असा आत्मविश्वास हिंदू समाजाने बाळगला पाहिजे, असे परखड मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
देशाची फाळणी करून समस्या सुटणार नाहीत, तर वाढतील, असे भाकीत स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या विचारवंतांनी त्यावेळी केले होते. परंतु त्याकडे त्या वेळच्या राजकीय धुरीणांनी दुर्लक्ष केले. आता मात्र आपणास खंडित भारत पुन्हा अखंड केला पाहिजे अन्यथा हिंदूंची शक्ती घटलेली आपल्याला पाहावी लागेल. हिंदूंची शक्ती घटवायची नसेल, हिंदुत्वाची भूमिका पातळ करायची नसेल, हिंदू समाजाला हिंदू म्हणूनच टिकून राहायचे असेल तर अखंड भारत पुन्हा निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही याची खूणगाठ हिंदू समाजाने बांधली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले आहे.
If Hindus want to remain Hindus, then the fragmented India has to be made intact again
महत्त्वाच्या बातम्या
- कानपुरमधील मॅच दरम्यान व्हारल झालेल्या गुटखा मॅनचा आणखी एक फोटो होतोय तुफान व्हायरल
- एसटी कर्मचारी संप ,विलीनीकरणाबाबत काय म्हणाले अजित पवार
- महाडिक-पाटील गटात ‘समझोता’ आगामी निवडणुकात पुन्हा दिसणार का?
- महाराष्ट्रात नवे कोरोना निर्बंध : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची भीती, ठाकरे सरकारची नवी नियमावली, वाचा सविस्तर…