• Download App
    देशभरात महिन्याला 20 कोटी डोस दिल्यास वर्षअखेरीस कोरोनावर नियंत्रण : डॉ. नागेश रेड्डी यांचा दावा।If given 20 crore doses per month across the country Corona control at the end of the year: Dr. Nagesh Reddy claims

    देशभरात महिन्याला 20 कोटी डोस दिल्यास वर्षअखेरीस कोरोनावर नियंत्रण ; डॉ. नागेश रेड्डी यांचा दावा

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : देशभरात महिन्याला कोरोनाविरोधी लशीचे 20 कोटी डोस दिल्यास वर्षअखेरीस कोरोनावर नियंत्रण आणता येईल, असा विश्वास एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीचे (एआयजी) संस्थापक ‘पद्मविभूषण’ डॉ. नागेश रेड्डी यांनी केला. If given 20 crore doses per month across the country Corona control at the end of the year: Dr. Nagesh Reddy claims

    कोरोनाचे संक्रमण आणि लाटा याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच सर्वांनी हेवेदावे बाजूला ठेवून कोरोनाशी लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
    कोविड उपचारात परदेशी पद्धतीचा प्रभाव आहे.



    उपचार भारतीय वातावरणाशी जुळत नाही. त्यामुळे आम्ही चार भागांमध्ये नवी उपचार पद्धती विकसित केली आहे. या माध्यमातून एआयजीच्या 52 डॉक्टरांच्या पथकाने 20,000 रुग्णांवर उपचार केले. यातील 99 टक्के रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती डॉ. रेड्डी यांनी दिली. या नव्या उपचारपद्धतीची पुस्तिका देशातील एक लाख डॉक्टर आणि वैद्यकीयतज्ञांना देणार आहोत, असे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले.

    रणनीतीसाठी सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र यावे

    देशाची लोकसंख्या पाहता कुणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. जूनच्या अखेरीस संसर्ग नियंत्रित होऊ शकतो. त्यासाठी सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन लाट रोखण्यासाठी रणनीती तयार करावी, असे आवाहन डॉ. नागेश रेड्डी यांनी केले.

    If given 20 crore doses per month across the country Corona control at the end of the year: Dr. Nagesh Reddy claims

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    GST collection : डिसेंबरमध्ये GST संकलन 6.1% नी वाढून ₹1.74 लाख कोटींच्या पुढे; कर कपातीनंतरही महसुलात वाढ

    Vande Bharat : पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी-कोलकातादरम्यान धावणार; थर्ड एसीचे भाडे ₹2,300, वैष्णव म्हणाले- बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 पर्यंत येईल

    Indore  Contaminated : इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे 14वा मृत्यू; 162 जण भरती; मृतांच्या नातेवाईकांनी चेक घेण्यास नकार दिला