वृत्तसंस्था
लखनौ : फार मोठा गाजावाजा करून मोदी सरकारच्या विरोधात बनवलेल्या काँग्रेस प्रणित I.N.D.I आघाडीला मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सुरुंग लागला आहे. If Congress had said earlier, they would not have discussed with him
काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला आश्वासन देऊन देखील एकही जागा सोडली नाही. त्यामुळे संतापलेल्या अखिलेश यादव यांनी I.N.D.I आघाडीलाच दोन्ही राज्यांमध्ये सुरुंग लावून टाकला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्र्यांनी समाजवादी पार्टीच्या नेत्यांशी चर्चा केली होती. समाजवादी पार्टीला 6 जागा सोडण्याची त्यांनी तयारी दाखविली होती, पण प्रत्यक्षात काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये समाजवादी पार्टीला एकही जागा सोडली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अखिलेश यादव संतप्त झाले.
कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये I.N.D.I आघाडी अस्तित्वातच नाही, हे काँग्रेस नेत्यांनी आम्हाला आधी सांगितले असते, तर आम्ही उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात त्यांच्याशी चर्चा करायला पुढेच आलो नसतो. आमचा वेळ वाया घालवला नसता, असे संतप्त उद्गार अखिलेश यादव यांनी काढून दोन्ही I.N.D.I आघाडीला सुरुंग लावून मोकळे झाले.
केंद्रातले मोदी सरकार हटवण्यासाठी काँग्रेस आमची मदत मागते आणि राज्यांमध्ये आम्हाला बाजूला काढते हे आम्हाला चालणार नाही, असा गंभीर इशारा अखिलेश यादव यांनी दिला. काँग्रेसच्या कृती मधून आणि अखिलेश यादव यांच्या वक्तव्यातून I.N.D.I आघाडीला मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले. मध्य प्रदेशात समाजवादी पार्टी आता 50 पेक्षा जास्त उमेदवार काँग्रेस विरोधात उभे करणार आहे.
If Congress had said earlier, they would not have discussed with him
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींशिवाय काँग्रेसकडून कोण असू शकतो पंतप्रधानपदाचा उमेदवार? शशी थरूर यांनी केला खुलासा
- समलिंगी विवाहाची याचिका सुप्रीम कोर्टाने ३ विरुद्ध २ मतांनी फेटाळली!!; का?? आणि कशी?? वाचा तपशील!!
- ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
- Same Sex Marriage : समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार