जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत शशी थरूर
विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपुर : Shashi Tharoors देशभरातील आपल्या अनेक मोठ्या नेत्यांसह सतत जनाधार कमी होत चाललेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा अडचणी येऊ शकतात. यावेळी काँग्रेस हायकमांडला केरळमधून झटका बसण्याचे संकेत मिळाले आहेत. पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी असे विधान केले आहे की, आता त्यांनी आरपारचा निर्णय घेतला आहे असे दिसते.Shashi Tharoors
तिरुअनंतपुरममधून चार वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले शशी थरूर म्हणाले आहेत की जर काँग्रेसला त्यांची गरज नसेल तर त्यांच्याकडे कामासाठी इतर अनेक पर्याय आहेत. शशी थरूर यांनी मल्याळम पॉडकास्टमध्ये इंडियन एक्सप्रेसशी बोलताना हे सांगितले.
शशी थरूर २०२६ मध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीबद्दल बोलत होते. त्यांनी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गरजांवर चर्चा केली. यादरम्यान, ते म्हणाले की, अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की केरळमध्ये नेतृत्व स्वीकारण्यात मी इतरांपेक्षा खूप पुढे आहे. जर काँग्रेस पक्षाला माझा वापर करायचा असेल तर मी पक्षासाठी उपलब्ध असेन. जर त्यांना माझी गरज नसेल, तर मला माझे स्वतःचे काम करायचे आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही असे तुम्ही समजू नका. माझ्याकडे जगभरातून पुस्तके, भाषणे आणि आमंत्रणे आहेत.
If Congress does not need me Shashi Tharoors statement sparks debate
महत्वाच्या बातम्या
- Amit Shah सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक,केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आवाहन
- Bangladesh : बांगलादेशात अराजकता सुरूच, बीएनपी नेत्याची मारहाण करत हत्या!
- Madan Rathore : भाजपच्या राजस्थान प्रदेशाध्यक्ष पदावर मदन राठोड यांची बिनविरोध निवड!
- Gaza : गाझा पुननिर्माणासाठी अरब देशांचा पुढाकार, 5 वर्षांत विकसित करण्याचे उद्दिष्ट; सहा देश आले एकत्र