• Download App
    'काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सनातन धर्माचा अपमान केला तर बघेल गप्प का बसले?', भाजपाचा थेट सवाल! If allies of Congress insult Sanatan Dharma why did Baghel remain silent direct question of BJP

    ‘काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सनातन धर्माचा अपमान केला तर बघेल गप्प का बसले?’, भाजपाचा थेट सवाल!

    भाजपा नेते रविशंकर  प्रसाद यांनी भरसभेतून केली जोरदार टीका

    विशेष प्रतिनिधी

    बिहार: भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधला आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांकडून ‘सनातन धर्मा’चा अपमान होत असताना ते गप्प का बसले, असा सवाल केला. सूरजपूर जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, भारतातील जनता सनातनचा अपमान सहन करणार नाही. If allies of Congress insult Sanatan Dharma why did Baghel remain silent direct question of BJP

    रविशंकर प्रसाद म्हणाले, “बघेलजी म्हणतात की ते प्रभू रामाचा आदर करतात आणि ‘राम वन गमन पथ’ विकसित करत आहेत, परंतु मला त्यांना विचारायचे आहे की तुमच्या सहकाऱ्यांकडून सनातन धर्माचा अपमान झाला तेव्हा तुम्ही गप्प का राहिलात? ते काय होते? द्रमुक नेते आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सनातनला डेंग्यू, टीबी आणि एड्ससारखे आजार असल्याचे सांगितले. हा कसला विनोद आहे? आम्ही (भाजप) प्रत्येक धर्माचा आदर करतो.

    रविशंकर प्रसाद म्हणाले की, बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचे शिष्य चंद्रशेखर यांनी रामचरितमानस वाचण्यास  विष पिण्यासमान म्हटले आहे.  तुम्ही इतर धर्मांविरुद्ध बोलू शकता का? प्रभारत सनातनचा अपमान सहन करणार नाही.

    If allies of Congress insult Sanatan Dharma why did Baghel remain silent direct question of BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??