• Download App
    '400+ जागा जिंकल्या असत्या तर..' केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं मोठं विधान! If 400 Plus seats were won PoK would have come to India Union Minister Prataprao Jadhavs big statement

    ‘400+ जागा जिंकल्या असत्या तर..’ केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं मोठं विधान!

    जाणून घ्या, शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी नेमकं कशाबद्दल म्हटलं आहे. If 400 Plus seats were won PoK would have come to India Union Minister Prataprao Jadhavs big statement

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा जोरात मांडण्यात आला होता. आता निवडणूक निकाल आणि सरकार स्थापनेनंतर केंद्रीय मंत्री शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी पीओकेबाबत मोठा दावा केला आहे. एनडीएने लोकसभेत 400 हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पीओके परत घेणे शक्य झाले असते, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणखी काय म्हणाले ते जाणून घेऊया.

    एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनीही दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पीओकेचा भारताच्या नकाशात समावेश करण्याचे स्वप्न खूप दिवसांपासून पाहत आहेत.



    लोकसभा निवडणुकीत एनडीएने 400 हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात सामील करून घेणे आणि . 1962 मध्ये चीनने ताब्यात घेतलेली जमीन परत घेणे शक्य झाले असते, असे प्रतापराव जाधव यांनी रविवारी सांगितले. तसेच, भारताचा अविभाज्य भाग असूनही पीओके पाकिस्तानच्या ताब्यात आहे, असंही ते म्हणाले.

    खासदार प्रतापराव जाधव यांनीही दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पीओकेचा भारताच्या नकाशात समावेश करण्याचे स्वप्न खूप दिवसांपासून पाहत आहेत. ते म्हणाले की, 1962 च्या युद्धात चीनने ताब्यात घेतलेल्या जमिनीवर पुन्हा दावा करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या तर दोन तृतीयांश बहुमत मिळू शकले असते, असं ते म्हणाले.

    बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी विरोधी पक्षांवर पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास राज्यघटना बदलू, असा खोटा प्रचार करत असल्याचा आरोप केला. जाधव म्हणाले की, संविधान बदलता येणार नाही. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी राज्यघटनेच्या विध्वंसाचे वास्तविक उदाहरण म्हणून त्यांनी वर्णन केले.

    If 400 Plus seats were won PoK would have come to India Union Minister Prataprao Jadhavs big statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक